Bihar Crime News Saam tv
देश विदेश

Bihar Crime News: धक्कादायक! आईने आणि भावाने दिली प्रेमाची क्रूर शिक्षा, हत्येनंतर मुलीचा मृतदेह घरातच पुरला

Bihar Mother Killed Daughter : बिहारमध्ये प्रेमसंबंधाला (Love Affair) विरोध करत आईने आणि भावाने एका तरुणीची हत्या केली.

Priya More

Bihar News: राज्यात आणि देशामध्ये 'सैराट' चित्रपटासारख्या (Sairat Movie)अनेक घटना घडताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये प्रेमसंबंधाला विरोध करत भावाने आपल्या बहिणीचे शीर धडावेगळे केले होते. ही घटना ताजी असतानाच आता बिहारमध्ये प्रेमसंबंधाला (Love Affair) विरोध करत आईने आणि भावाने एका तरुणीची हत्या केली. हत्येनंतर त्यांनी तरुणीचा मृतदेह घरामध्येच पुरला. या धक्कादायक घटनेमुळे बिहार (Bihar Crime) हादरले

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या सीतामढी (sitamarhi) जिल्ह्यात ही घटना घडली आहे. परसौनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेलवार गावातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये राहणाऱ्या १८ वर्षांच्या तरुणीची हत्या करण्यात आली. आईने आणि भावानेच या तरुणीची गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर त्यांनी तिचा मृतदेह घरामध्ये पुरला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणीचा पुरलेला मृतदेह बाहेर काढून ताब्यात घेतला.

पोलीस आलेले पाहून घटनास्थळावरुन हत्या करण्यात आलेल्या तरुणीच्या भावाने पळ काढला. पोलिसांनी तरुणीच्या आईला ताब्यात घेतले. पोलिसांनी या महिलेची चौकशी केली असता तिने हत्येची कबुली दिली. चौकशीदरम्यान, मुलाच्या मदतीने गळा दाबून मुलीची हत्या केली असल्याचे आरोपी महिलेने पोलिसांना सांगितले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मृत तरुणीचे गावामध्ये राहणाऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. पण तरुणीच्या कुटुंबीयांना जेव्हा तरुणीच्या प्रेमसंबंधाविषयी माहिती मिळाली तेव्हा ते संतप्त झाले. त्यांनी या प्रेमसंबंधाला विरोध केला. पण तरुणीने आई आणि भावाचे काहीच ऐकले नाही. त्यामुळे संतप्त होत आई आणि भावाने तरुणीची गळा दाबून हत्या केली.

पोलिसांनी तरुणीच्या आईला अटक केली असून तिची चौकशी सुरु आहे. पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी सांगितले की, 'घरामध्ये पुरलेला मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी सीतामढी येथील रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. या घटनेमुळे बिहार हादरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवारांना त्या दिवशी फोन का केला होता? प्रफुल्ल पटेलांनी दिलं उत्तर

Viral Video: 31 व्या मजल्यावरील खिडकीच्या बाहेर भलंमोठं मधमाश्यांचं पोळं; रहिवाश्यांनी केला व्हिडीओ शेअर

मनसे प्रमुख राज ठाकरे एकनाथ शिंदेंच्या घरी; राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

Revati Lele Wedding: प्रसिद्ध अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात; पुण्यातील राहत्या घरी झाला ग्रहमख विधी; PHOTO पाहा

Amol Kolhe: विलिनीकरणानंतर अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष होणार होते, रोहित पवारांचा दावा कितपत खरा?, कोल्हे म्हणाले...

SCROLL FOR NEXT