Bihar Lakhisarai Accident News  Saam TV
देश विदेश

Accident News: प्रवाशांनी खचाखच भरलेल्या रिक्षाला अज्ञात वाहनाने उडवलं; ८ जणांचा जागीच मृत्यू, ७ गंभीर जखमी

Bihar Accident News: प्रवाशांनी खचाखच भरलेल्या रिक्षाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ७ प्रवासी गंभीर जखमी झाले.

Satish Daud

Bihar Lakhisarai Accident News

प्रवाशांनी खचाखच भरलेल्या रिक्षाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ७ प्रवासी गंभीर जखमी झाले. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना बिहारमधील लखीसराय जिल्ह्यात मंगळवारी (२० फेब्रुवारी) रात्रीच्या सुमारास घडली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातंय. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

बिहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त रिक्षामधून १५ प्रवासी प्रवास करीत होते. मंगळवारी रात्री लखीसराय-सिकंदरा मुख्य रस्त्यावरील बिहारौरा गावाजवळ रिक्षा आली असता, अज्ञात वाहनाने समोरून जोरदार धडक दिली. (Latest Marathi News)

हा अपघात इतका भीषण होता, की रिक्षाचा अक्षरश: चक्काचूर झाला. या घटनेत ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत बचावकार्य केले. सध्या मृतांची ओळख पटवणे सुरू आहे.

पोलीस मयताच्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे त्याच्या कुटुंबीयांना माहिती देऊन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, काही जखमींची ओळख पटली आहे. रिक्षाला नेमकी कोणत्या वाहनाने धडक दिली. याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जमिनीचे तुकडे मंजुरीशिवाय विकता येणार नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

Hardik Pandya: मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पंड्यामध्ये बिनसलं? काय आहे नेमकं सत्य, वाचा

पेट्रोल-डिझेलची बचत करा, सोनं खरेदी करू नका; मोदींच्या आवाहनावर महाराष्ट्राचा कौल काय? मुंबई-पुण्यासह, नागपूरकरांची भूमिका स्पष्ट

Shani Jayanti 2026: शनी जयंतीला होणार बुध-शुक्राचं गोचर; या राशींना मिळणार पैसाच पैसा

मुलीच्या हळदीत वडिलाचं हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू; लग्न घरावर कोसळला दुःखाचा डोंगर

SCROLL FOR NEXT