Twitter News Saam TV
देश विदेश

Twitter News: ट्विटर युजर्सना मोठा धक्का; या कारणामुळे अचानक अकाउंट बंद...

पत्रकारांना ब्लॉक केले नसते तर पत्रकारांनी ही माहिती दाखवली असती, असे एलन यांनी म्हटले आहे.

साम टिव्ही ब्युरो

Twitter News: प्रत्येक व्यक्तीला मोकळेपणाने आपले मत मांडण्यासाठी ट्विटर हे एक सोशल मीडिया अकाउंट आहे. अनेक व्यक्ती या प्लॅटफॉर्मवर व्यक्त होत असतात. अशात एलन मस्क यांनी ट्विटर वापरकर्त्यांना मोठा धक्का दिला आहे. त्यांनी कोणतीही पूर्व सुचना न देता काही व्यक्तींचे टि्विटर अकाउंट बंद केले आहेत. यामुळे अनेक व्यक्ती ट्विटर रिपोर्ट करत आहेत. (Latest Marathi News)

पत्रकारांचे ट्विटर अकाउंट पाडेल बंद

अधिक माहिती अशी की, एलन मस्क यांनी गुरूवारी ही कारवाई केली. त्यांनी ट्विटरवर असलेल्या मोठ्या पत्रकारांचे अकाउंट बंद केले. पत्रकारांना या संदर्भात कोणतीही पूर्व कल्पना मिळालेली नाही असे त्यांचे म्हणणे आहे. एलन मस्क हे नेहमीच वादाच्या विळख्यात अडकलेले दिसतात. अशात अचानक अकाउंट बंद केल्याने पत्रकारांना काही समजले नाही यामुळे त्यांचा मोठा गोंधळ उडाला.

या कारणासाठी केले अकाउंट बंद

पत्रकारांचे अकाउंट बंद केल्यानतंर या बाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार एलन मस्क त्यांच्या एका खाजगी जेटने एका ठिकाणी जाणार होते. त्यांना आपली ही माहिती कुठेही पसरवायची नव्हती. पत्रकारांना (Reporter) ब्लॉक केले नसते तर पत्रकारांनी ही माहिती दाखवली असती, असे एलन यांनी म्हटले आहे.

एलन मस्क यांनी यावर म्हटले आहे की, आम्ही प्रत्येक पत्रकाराला अकाउंट बंद करण्याआधी सूचना दिल्या होत्या. तसेच शुक्रवारी रात्री पर्यंत सर्वांचे अकाउंट त्यांना परत करण्यात आले आहेत. अशात आता या वादामुळे इतर व्यक्ती देखील चिंतेत आहेत. आपलेही ट्विटर (Twitter) आकाउंट कधीही बंद केले जाऊ शकते अशी शंका युजर्सना सतावत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mini Kashmir Tourism: महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! विकेंडला निसर्गाच्या कुशीत पार्टनरसोबत घालवा वेळ, रोमॅंटिक ठिकाणी कसं जाल?

विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; तीन नेत्यांचे तडकाफडकी राजीनामे

Crime News : अनैतिक संबंधांना विरोध करणाऱ्या १५ वर्षांच्या मुलाची आईनंच केली हत्या; एक क्लू अन् हादरवून टाकणारा प्लान उघड

दाताच्या समस्यांवर तगडा उपाय! मीठ - पाण्याच्या गुळण्या केल्याने तोंडाची दुर्गंधी आणि हिरड्यांची सूज होईल कमी, असा करा वापर

Maharashtra News Live Update: पेरणीची घाई न करण्याचे निर्देश कृषी विभागातर्फे देण्यात आले असताना शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू

SCROLL FOR NEXT