Johnson Baby Powder Saam TV
देश विदेश

Johnson Baby Powder : जॉन्सन अॅंड जॉन्सन कंपनीला मोठा दिलासा; बेबी पावडर उत्पादन आणि विक्रीसाठी हायकोर्टाने दिली परवानगी

कंपनीच्या पावडर उत्पादन आणि विक्री दोन्हीसाठी परवानगी दिली आहे.

Ruchika Jadhav

Johnson Baby Powder : मुंबई उच्च न्यायालयाने जॉन्सन अॅंड जॉन्सन या कंपनीला मोठा दिलासा दिला आहे. कंपनीच्या बेबी पावडर उत्पादनाला आणि विक्रीला देखील मान्यता देण्यात आली आहे. यात अन्न आणि औषध प्रशासनाचा आदेश रद्द ठरवला गेला आहे. (Latest Johnson Baby Powder)

साल २०२२ च्या शेवटी अन्न आणि औषध प्रशासनाने जॉन्सन अॅंड जॉन्सन या कंपनीवर कारवाई केली होती. येवेळी कंपनीच्या बेबी पावडरच्या विक्रीवरच नाही तर उत्पादनावर देखील बंदी घालण्यात आली होती. मात्र आता न्यायालयाने कंपनीला मोठा दिलासा दिला आहे. काल न्यायालयाने आपल्या निकालात कंपनीच्या पावडर उत्पादन आणि विक्री दोन्हीसाठी परवानगी दिली आहे.

गेल्या वर्षी १५ सप्टेंबर रोजी शासनाने जॉन्सन अॅंन्ड जॉन्सन या कंपनीचा परवाना रद्द केला होता. त्यानंतर २० सप्टेंबर रोजी बेबी पावडरचा परवानाही रद्द करण्यात आला. तसेच कंपनीच्या बेबी पावडरमुळे कॅन्सर होऊ शकतो असे म्हटले होते. यामुळे कंपनीने थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

मुंबई उच्च न्यायालयाने यावर काय म्हटले आहे?

कोणत्याही सौंदर्य प्रसादनाच्या कंपनीला अशा पद्धतीने परवाना रद्द करणे योग्य नाही. सौंदर्यप्रसादने बनवताना आरोग्याची काळजी घेणे महत्वाचेच आहे. मात्र जर काही छोटी चूक झाली तर थेट परवाना रद्द करणे हा एकच पर्याय आहे का? असा प्रश्न न्यायालयाने अन्न आणि औषध प्रशासनाला केला आहे. न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती एस. जी. दिघे यांच्या खंडपीठाने कंपनीचा परवाना रद्द करण्याचा आदेश हा फार कठोर होता असे मत नोंदवत अन्न आणि औषध प्रशासनाचा हा परवाना रद्द करण्याचा आदेश रद्द केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

SCROLL FOR NEXT