Uttar Pradesh Bus Accident Saam Tv
देश विदेश

भीषण अपघात! भरधाव बसची उभ्या बसला जोरदार धडक; ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू, ३६ जखमी

अनेक जखमी प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

साम टिव्ही ब्युरो

लखनऊ : भरधाव वेगात असलेल्या डबल डेकर बसने उभ्या असलेल्या दुसऱ्या बसला जोरदार धडक (Bus Accident) दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये बसमधील ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ३६ हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले. अंगावर काटा आणणारी ही घटना उत्तरप्रदेशच्या (Uttar Pradesh) बाराबंकी जिल्ह्यात घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केलं. (Uttar Pradesh Two Bus Accident)

प्राप्त माहितीनुसार, बिहारमधील सीतामढीहून प्रवाशांनी भरलेली डबल डेकर बस दिल्लीकडे निघाली होती. भरधाव वेगात जाणाऱ्या या बसने नरेंद्रपूर मद्राहा गावाजवळ उभ्या असलेल्या दुसऱ्या बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये बसमधील ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर ३६ हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर घटनास्थळी मोठी आरडाओरड सुरू झाली. त्याचवेळी परिसरातील नागरिकांनी बसच्या दिशेने धाव घेतली. दरम्यान, हा अपघात लोणीकटरा पोलीस स्टेशन परिसरात झाल्याने स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना बसमधून बाहेर काढत तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. (Bus Accident News)

मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या अनेक जखमी प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर झालेल्या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.

योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करून लिहिलं की, पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर झालेला अपघात खूपच भयंकर आहे. यात झालेली जीवितहानी खूप दुःखद आहे. तातडीने मदत आणि बचाव कार्य आणि जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. प्रभू श्री राम मृतांच्या आत्म्यांना शांती देवो आणि जखमी रुग्ण लवकरात लवकर बरे होवो.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात कोयता, हातोड्याने मारहाण; कॉलेजमध्ये झाला राडा! हाणामारीचे Video Viral

Shahapur : अखेर चौथ्या दिवशी सापडला युवकाचा मृतदेह; भारंगी नदीत बुडून झाला मृत्यू

Skin Care: सतत खोट्या आयलॅशेस लावण्याने होतील हे नुकसान, वेळीच व्हा सावधान

Body changes after cancer: कॅन्सर झाल्यानंतर शरीरामध्ये कोणते मोठे बदल दिसून येतात?

Kalyan News: कोळसेवाडी व विजयनगरमध्ये मध्यरात्री गाड्यांची तोडफोड; कल्याणमध्ये भीतीचं वातावरण|VIDEO

SCROLL FOR NEXT