Congress  Saam Tv
देश विदेश

मोठी बातमी! कॉंग्रेस नेत्याने अचानक राजकारणातून घेतला ब्रेक; कारण....

सोळंकी यांनी स्वत: पत्रकार परिषद घेत राजकारणातून ब्रेक घेत असल्याचं सांगितलं आहे

साम टिव्ही ब्युरो

अहमदाबाद : राज्यात एकीकडे राज्यसभेच्या निवडणुकीवरून (Rajya Sabha Election) राजकीय वातावरण तापलं असतानाच, दुसरीकडे गुजरातमधून (Gujrat) एक मोठी बातमी समोर आली आहे. गुजरात काँग्रेसचे (Congress) माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री भरतसिंह सोळंकी (Bharat Singh Solanki) यांनी राजकारणातून ब्रेक घेण्याची घोषणा केली आहे. या काळात काही महिने राजकारणापासून दूर राहणे हा त्यांचा स्वतःचा निर्णय असल्याचे सोळंकी यांनी म्हटलं आहे. (Gujarat Congress Latest News)

मी काही दिवस राजकारणातून ब्रेक घेत असून सामाजिक उपक्रमांवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सोळंकी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. तसेच पुढील काळात दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि इतर मागासलेल्या समाजातील लोकांना भेटण्यासाठी अधिक वेळ देईन, असंही सोळंकी यांनी स्पष्ट केलं आहे. सोळंकी यांचा काही दिवसांपूर्वी एका तरुणीसोबत बंद खोलीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

या व्हिडिओत त्यांच्या पत्नी रेश्मा पटेल या आपल्या पतीसह त्यांच्यासोबत खोलीत असलेल्या तरुणीला सुनावतांना दिसून आल्या होत्या. दरम्यान, त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुजरातच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर पक्षश्रेष्ठीकडून सोळंकी यांना राजकारणातून ब्रेक घेण्याच्या सूचना असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, मला हायकमांडकडून कोणतीही सूचना मिळाली नसल्याचा दावा सोळंकी यांनी केला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत असा दावा केला जात आहे की, सोलंकी यांच्या पहिल्या पत्नीनं त्यांना दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडलं.'व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत असा दावा केला जात आहे की, सोळंकी यांच्या पहिल्या पत्नीने त्यांना दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेश्मा पटेल यांना आपले पती भरतसिंह सोळंकी हे एका तरुणीसह बंद खोलीत पार्टी करत असल्याची माहिती मिळाली होती.

सदरील माहिती मिळताच रेश्मा पटेल काही लोकांसह त्याठिकाणी पोहचल्या आणि सोळंकी यांना तरुणीसह रंगेहाथ पकडले. भरतसिंह सोळंकी आणि त्यांची पत्नी रेश्मा यांच्यात घटस्फोटावरून कायदेशीर लढाई सुरू आहे. एका पत्रकार परिषदेत सोळंकी यांनी सांगितले की, त्यांनी घटस्फोटासाठी आधीच अर्ज दाखल केला आहे आणि आरोप केला आहे की त्यांच्या पत्नीला त्यांच्या मालमत्तेत रस आहे आणि त्यांच्या जीवाला धोका आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

Alcohol Side Effects: मेंदुपासून थेट ह्रदयाला धोका, दारुमुळे शरीरावर होतात हे 7 गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT