iphone 13
iphone 13 saam tv
देश विदेश

iPhone 13 वर मोठी डिस्काउंट ऑफर, पाहा काय आहेत डिटेल्स

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

स्मार्टफोनच्या जमान्यात नवा कोरा ब्रॅंडचा आयफोन खरेदी (iphone smartphone) करण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र, खिशाला कात्री लागेल एवढ्या अवाढव्य किंमतीचे आयफोन विकत घेण्याची हिंमत फारच कमी लोकं करतात. मात्र, आता आयफोन कंपनीनं सामान्य ग्राहकांनाही दिलासा दिला आहे. आताचा लेटेस्ट ब्रॅंड iphone 13 खरेदी करायचा तुमचा प्लॅन असेल, तर या फोनवर तुम्हाला एक शानदार ऑफर मिळणार आहे. या फोनला तुम्ही (Discount offer) डिस्काउंट, बॅंक ऑफर आणि एक्स्चेंज बोनससोबत खरेदी करु शकता. म्हणजेच या फोनवर तीन-तीन ऑफर मिळणार आहेत. जाणून घेवूयात याबद्दलची सविस्तर माहिती.

नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा तुमचा प्लॅन असेल, तर आता तुम्ही आयफोनचाही विचार करु शकता. प्रिमियम मार्केटमध्ये अॅपलचा लेटेस्ट प्लेयर iphone 13 वर आकर्षक डिस्काउंट मिळणार आहे. यासाठी तुम्हाला अॅमेजॉन, फ्लिफकार्ट मध्ये नाही, तर क्रोमा स्टोअरमध्ये जावं लागणार आहे. या स्टोअरमध्ये तुम्हाला डिस्काउंटसोबतच एक्स्चेंज ऑफर आणि इतरही फायदे मिळणार आहेत. क्रोमामध्ये iPhone 13 स्मार्टफोनवर तुम्हाला आता दहा रुपये कमी किंमतीत मिळणार आहे.

कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात हा फोन लॉंच केला होता. या फोनच्या सीरिजमध्ये iPhone 13, iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max आणि iPhone 13 मिनी या फोनचा समावेश केला आहे. दरम्यान, येत्या सप्टेंबर महिन्यात कंपनीकडून नवीन आयफोन लॉंच केले जाऊ शकतात. तोपर्यंत तुम्हाला हे स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी आहे.

iPhone 13 वर मिळणार डिस्काउंट

आयफोन 13 ची किंमत 79,990 एवढी आहे. पण क्रोमामध्ये या स्मार्टफोनवर १० हजार रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. डिस्काउंट दिल्यानंतर हा फोन तुम्हाला 69,900 रुपयांना खरेदी करता येणार आहे. याशिवाय तुम्हाला HDFC बॅंक कार्ड्सवर 4000 रुपयांचं डिस्काउंटचा लाभही घेता येणार आहे. त्यानंतर या फोनची किंमत 64,900 इतकी होईल. जर तुम्ही आधीपासूनच आयफोन युजर असाल, तर तुम्ही जुना फोन एक्स्चेंजही करु शकता.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut Water Side Effects: नारळ पाणी कोणी पिऊ नये?

Today's Marathi News Live: भाविकांची प्रतिक्षा संपली! दोन जूनपासून विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन सुरू

Pandharpur News: भाविकांसाठी आनंदाची बातमी! पंढरपुरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन २ जूनपासून सुरू होणार

Tharla Tar Mag: सुभेदार कुटुंबिय साजरा करणार सायली-अर्जुनचा लग्नाचा पहिला वाढदिवस; मालिकेचा नवीन प्रोमो आऊट

Special Report | फडणवीसांची अजित पवारांना जाहीर क्लिन चिट!

SCROLL FOR NEXT