Gyanvapi Case Saam TV
देश विदेश

Gyanvapi Case: ज्ञानवापी प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; शिवलिंगाच्या कार्बन डेटिंग चाचणीला परवानगी

Gyanvapi Case: ज्ञानवापी मशीद-शृंगार गौरी मंदिरप्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे

साम टिव्ही ब्युरो

Gyanvapi Case: ज्ञानवापी मशीद-शृंगार गौरी मंदिरप्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. ज्ञानवापी मशिदीच्या वजुखान्यात असलेल्या कथित शिवलिंगाची कार्बन डेटिंग चाचणी करण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर कार्बन डेटिंग चाचणी करताना संरचनेचे कोणतेही नुकसान होऊ देऊ नका, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने ज्ञानवापी कॅम्पसमध्ये सर्वेक्षणादरम्यान सापडलेल्या शिवलिंगाची कार्बन डेटिंग चाचणी आणि वैज्ञानिक सर्वेक्षणासाठी दाखल केलेली याचिका स्वीकारली असून शिवलिंगाला इजा न करता त्याची कार्बन डेटिंग चाचणी करण्याचे आदेश भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला दिले आहेत.

विशेष बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वी वाराणसी न्यायालयाने शिवलिंगाची कार्बन डेटिंग चाचणी घेण्यास नकार दिला होता. त्याविरोधात हिंदू पक्षकारांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज या प्रकरणाची सुनावणी पार पडली.

या सुनावणीत उच्च न्यायालयाने शिवलिंगाची कार्बन डेटिंग चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे. न्यायमूर्ती अरविंद कुमार मिश्रा यांनी लक्ष्मी देवी आणि इतरांच्या याचिकेवर हा आदेश दिला आहे. या याचिकेवर राज्य सरकारच्या वतीने अतिरिक्त महाधिवक्ता एमसी चतुर्वेदी आणि मुख्य स्थायी अधिवक्ता बिपिन बिहारी पांडे यांनी बाजू मांडली.

या याचिकेवर राज्य सरकारच्या वतीने अतिरिक्त महाधिवक्ता एमसी चतुर्वेदी आणि मुख्य स्थायी अधिवक्ता बिपिन बिहारी पांडे यांनी बाजू मांडली. हरिशंकर जैन, विष्णू शंकर जैन आणि ज्ञानवापी मशीद या वकिलांच्या वतीने एसएफए नक्वी यांनी याचिका मांडली. शिवलिंगाला इजा न करता कार्बन डेटिंग करता येईल का, अशी विचारणा न्यायालयाने केंद्र सरकारचे वकील मनोज कुमार सिंग यांना केली होती.

कार्बन डेटिंग म्हणजे काय?

एखाद्या वस्तूचे वय आणि वेळ ठरवण्याच्या पद्धतीला कार्बन डेटिंग म्हणतात. कार्बन डेटिंगला रेडिओ कार्बन डेटिंग असेही म्हणतात. कार्बन डेटिंगमध्ये कार्बनमध्ये C-14 नावाचा एक विशेष समस्थानिक म्हणजे आयसोटॉप असतो. याचं अणू वस्तुमान १४ इतकं असतं. हा कार्बन रेडिओऍक्टिव्ह असतो. जसजशी सदर वस्तू नष्ट होते. त्याप्रमाणे हा कार्बनही कमी होतो. यावरून एखाद्या धातू आणि सजीव प्राण्याचं वय ठरवलं जातं.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ideal Weight by Age: तुमचं वजन योग्य आहे का? १८ ते ६० वयापर्यंत वयानुसार जाणून घ्या किती असावे वजन

Maharashtra News Live Update: गणेश मंडळ आणि महापालिकेच्या बैठकीत गोंधळ

IAS Transfer: मोठा प्रशासकीय फेरबदल! १७ आयएएस अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री तडकाफडकी बदल्या; कुणाची कुठे पोस्टिंग?

Skin Care : सणांच्या घाईत त्वचेसोबत 'ही' चूक होत नाही ना? नॅचरल ग्लो हवा असेल, तर आजपासूनच करा हे ५ बदल

Private Part Hygiene Tips: प्रायव्हेट पार्टच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका! ‘या’ ५ गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या

SCROLL FOR NEXT