arvind kejriwal India Alliance Latest Marathi News  saam tv
देश विदेश

India Alliance News: इंडिया आघाडीला सर्वात मोठा धक्का; नितीश कुमार यांच्यानंतर केजरीवालांचा मोठा निर्णय

Arvind Kejriwal News: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी रविवारीच मोठी घोषणा केली आहे.

Satish Daud

India Alliance Latest Marathi News

ऐन लोकसभा निवडणूक तोंडावर असताना रविवारी (२८ जानेवारी) इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला. भाजपविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधणाऱ्या नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीतून माघार घेतली. बिहारमधील राष्ट्रीय जनता दलासोबतची युती तोडून त्यांनी भाजपासोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. ही जखम ताजी असतानाच इंडिया आघाडीला पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कारण, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी रविवारी मोठी घोषणा केली आहे. हरियाणातील आगामी विधानसभा निवडणूक आप एकट्याने लढणार असल्याचं केजरीवाल यांनी जाहीर केलं आहे. (Latest Marathi News)

मात्र, असं असलं तरी, या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पक्ष इंडिया आघाडीसोबत लढणार आहे, असंही केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी सांगितले. हरिणायात विधानसभेच्या 90 जागा आहे. या जागा आप स्वबळावर लढणार असल्याचं केजरीवाल यांनी जाहीर केलं आहे.

त्यांच्या या घोषणेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. गेल्या आठवड्यात विरोधकांच्या इंडिया आघाडीला धक्का देत तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणूक एकट्याने लढवणार असल्याची घोषणा केली होती.

त्यानंतर बिहारमधील नितीश कुमार यांचा जेडीयू पक्षही इंडिया आघाडीतून बाहेर पडला आहे. त्यातच आता अरविंद केजरीवाल यांनी हरियाणातील विधानसभेच्या निवडणुका आप एकट्याने लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी केजरीवाल यांनी दरवाजे खुले ठेवले आहेत.

"आज हरियाणा एका मोठ्या बदलाची वाट पाहत आहे. आधी दिल्ली आणि पंजाबमध्ये लोकांनी हा मोठा बदल केला आणि आता तिथले लोक आनंदी आहेत. आप सर्व 90 जागांवर निवडणूक लढवणार असून हरयाणात आम्ही पुढचे सरकार स्थापन करू. या देशाचे नंबर १ राज्य बनवले जाईल.", असं केजरीवाल यांनी माध्यमांना सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT