beer saam tv
देश विदेश

वाढत्या महागाईचा बिअर पिणाऱ्यांनाही ठसका, बिअरच्या किमती वाढणार, खिशाला कात्री

बिअर पॅकिंगसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

नरेश शेंडे

मुंबई : जीवनशैली उंचावण्यासाठी विविध प्रकारचे शौक करणाऱ्या लोकांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. बिअर पिण्याबाबात (Drinking beer) काही लोकांना नेहमीच उत्सुकता असते. पण बिअर पिणे आता सामान्य नागरिकांना परवडणार नाहीय. वाढत्या महागाईचा ठसका (inflation) आता बिअर पिण्याऱ्यांनाही बसणार आहे. कारण बिअर पॅकिंगसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. जवळपास २५ ते ३० टक्क्यांनी कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे बिअर कंपन्याही (beer price hike) आता किमती वाढण्याबाबत विचाराधीन आहेत. देशातील काही राज्यांमध्ये तर बिअरच्या किमती वाढल्याही आहेत. दरम्यान, मार्च महिन्यात वाढत्या उष्णतेमुळं बिअरच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे.

एका वेबसाईटने दिलेल्या रिपोर्टनुसार, बिअर बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती तीन महिन्यांतच दुपटीने वाढल्या आहेत. याशिवाय लेबल, कार्टून आणि बॉटल क्राऊनची किंमतही २५ टक्क्यांनी वाढली आहे. ग्लास मेकर्सनेही ३० टक्क्यांनी किमती वाढवल्या आहेत. त्यामुळेच बिअर कंपन्यांपुढे किमती वाढवण्याशिवाय पर्याय नसल्याचं बोललं जात आहे.

किमती वाढवणं मजबुरी

डिवान्स मॉडर्न ब्रेव्हरिज (Devans Modern Breweries) कंपनीचे एमडी प्रेम दिवान यांनी सांगितलं की, आमच्याकडे दोनच मार्ग आहेत. एकतर बिअर बॉटलच्या किमती वाढवाव्या लागतील, नाहीतर जी सवलत दिली जाते ती बंद करावी लागेल. डिवान्स गॉडफादर, कोट्सबर्ग पिल्‍स आणि सिक्‍स फील्‍ड यांसारखे मोठे बॅंड बनवते. भारतात बिअरच्या किमतींवर राज्य सरकारचं नियंत्रण असतं. राज्य सरकारच्या महसूल विभागाला मद्य विक्रीच्या करातून मोठ्या प्रमाणावर पैसा मिळतो. B9 बेव्हरेजेसचे संस्थापक आणि सीईओ अंकुर जैन यांनी म्हटलंय की, बिअर बनवण्यासाठी ग्लास, गहू, अॅल्यूमिनियम यांसारखे जे महत्वाचे घटक आहेत त्यांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. याबाबत आम्ही खुलासा करण्याचा प्रयत्न करत आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT