Viral video Saam Tv
देश विदेश

Viral Video : मेरा पिया घर आया... नवरदेवाला पाहताच नवरीचा आनंद गगनात मावेना; बेभान डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल

नववधूच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य, त्या क्षणाचा आनंद आणि त्या आनंदात तिने केलेला डान्स पाहून तुम्हालाही मस्त वाटेल .

साम टिव्ही ब्युरो

Viral Video : एका नववधुचा  व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नवरदेवाच्या एन्ट्रीवर नवरी मुलीने डान्स केला आहे. आपल्या होणाऱ्या साथीदाराला पाहताच नववधूच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य, त्या क्षणाचा आनंद आणि त्या आनंदात तिने केलेला डान्स पाहून तुम्हालाही मस्त वाटेल .

व्हायरल व्हिडीओत दिसतंय त्यानुसार, जेव्हा मिरवणूक दारात पोहोचते तेव्हा नववधू स्वत:ला रोखू शकली नाही. नववधू नवरदेवाला पाहताच नाचताना दिसत आहे. साजन मेरे सतरंगी, मेरा पिया घर आया ओ रामजी या गाण्यावर वधू थिरकताना दिसत आहे. (Latest Marathi News)

नववधूची डान्स करताना आनंद आणि एनर्जी यूजर्सना आवडतेय. वेडिंग वाइब्स या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 'Happiness on her face' असे कॅप्शन दिले आहे.

वधूचा हा आनंद आणि उत्साह पाहून आजूबाजूला उपस्थित असलेले लोकही स्वतःला रोखू शकले नाहीत. उपस्थित लोक टाळ्या वाजवत वधुला प्रोत्साहन देताना दिसले. दरम्यान नवरदेवाची एक झलकही व्हिडीओत पाहायला मिळाली. वधूच्या डान्सचा व्हिडिओ जोरात व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: आधी CA, मग IPS, नंतर IAS अधिकारी; माधव अग्रवाल यांचा प्रेरणादायी प्रवास

Maharashtra Live News Update: मातंग समाज पुन्हा आक्रमक,अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उमटणार पडसाद

T20 World Cup 2026: 'या' चुकीमुळे टीम इंडियाच्या हातातून निसटला सामना; पराभवानंतर सूर्यादादा संतापला

Misal Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी झणझणीत मिसळ कशी बनवायची? वाचा सोपी रेसिपी

Acidity Relief Food: पित्ताचा त्रास वाढतोय? सकाळच्या नाश्त्यात घ्या हा १ पदार्थ, अ‍ॅसिडीटी होईल गायब

SCROLL FOR NEXT