उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात डम्पर आणि कारचा भीषण अपघात झाला. यात कारचा चक्काचूर झाला. (Social media) Saam tv
देश विदेश

UP Accident News : महामार्गावर भीषण अपघात; डंपरमध्ये अडकून ५० मीटर फरफटत गेली कार, आई-वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

barabanki road accident family of four killed seven year old injured : उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात महामार्गावर भीषण अपघात झाला. भरधाव डंपरमध्ये अडकलेली कार ५० मीटरपर्यंत फरफटत गेली. यात कारमधील पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा मृत्यू झाला. तर सात वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

Nandkumar Joshi

सुरक्षित उपाययोजनांचा अभाव आणि काही मानवी चुका यामुळं रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होऊन त्यात अनेकांचा बळी जात आहे. उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातही अशीच एक भीषण अपघाताची घटना घडली. यात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला.

रामनगर-बाराबंकी महामार्गावर भुलभुलैया गावाजवळ एका ढाब्यासमोर मंगळवारी भरधाव डम्परची कारला जोरदार धडक झाली. ही कार डम्परमध्ये अडकली. जवळपास ५० मीटरपर्यंत कार फरफटत गेली. या अपघातात कारमधील पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. तर सात वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

ही धडक इतकी भयंकर होती की भरधाव डम्परच्या पुढच्या भागात कार अडकली. साधारण ५० मीटरपर्यंत ती डंपरसोबत फरफटत गेली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने कारच्या काचा फोडून आतमध्ये अडकलेल्या सर्वांना बाहेर काढले. कारमधील दाम्पत्य आणि त्यांची दोन मुले यात मृत्युमुखी पडली. तर एक सात वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली असून, तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

श्रावस्ती जिल्ह्यातील भिनगा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी मोहम्मद शरीफ यांच्या बहिणीची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ते मंगळवारी पत्नी तबस्सुम बानो आणि मुलगा उजैम, रुश्दा आणि सात वर्षांची मुलगी हुदा यांना घेऊन कारमधून लखनऊ येथे जात होते. भुलभुलैया गावाजवळ एका ढाब्यासमोर कार वळवताना भरधाव डंपरने धडक दिली. कार डंपरच्या पुढच्या भागात अडकली. ती रस्त्यावर जवळपास ५० मीटरपर्यंत फरफटत गेली. या भीषण अपघातानंतर आजूबाजूचे लोक घटनास्थळी धावले. तसेच माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांच्या मदतीने कारचा दरवाजा आणि काचा फोडून त्यात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले.

अपघातग्रस्त कुटुंबाला रुग्णवाहिकेतून सीएचसी बडागाव येथे नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी मोहम्मद शरीफ, त्यांची पत्नी तबस्सुम बानो आणि मुले उज्जैम, रुश्दा यांना मृत घोषित केले. तर सात वर्षीय हुदा ही गंभीर जखमी होती. तिला प्राथमिक उपचारानंतर जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेची माहिती श्रावस्ती येथील त्यांच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांना देण्यात आली. चौघांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर कुटुंब आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update: राहुल गांधी मांजरीत विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

PF Privacy : कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! खासगी कंपन्या तुमचा PF-ITR डेटा पाहू शकतात का? वाचा...

SCROLL FOR NEXT