Bangladesh Riot 
देश विदेश

Bangladesh Riot: बांगलादेशात अराजकता, ठीक-ठिकाणी घरांची जाळपोळ

Bangladesh Riot: बांगला देशात हिंदूंच्या घरांची जाळपोळ करण्यात आलीये. तर घरांची तोडफोड करण्यात येत असल्याचे सांगितलं जात आहे.

Vinod Patil

हा आक्रोश आहे बांग्लादेशातील हिंदू महिलेचा. ही घरं जळतायत ती हिंदूची. तोडफोड,जाळपोळ होतेय ती हिंदू मंदिरांची. बांगलादेशात हिंसाचार आणि जाळपोळ सुरू असतानाच, अल्पसंख्याक हिंदूंना लक्ष्य केलं जातंय. इस्लामधार्जिण्या विध्वंसकांकडून शोधून शोधून हिंदूना लक्ष्य करण्यात येतंय... घरं पेटवली जातायत. दुकानं लुटली जातायत. खून,बलात्कार आणि अत्याचाराच्या अनेक घटना हिंदूंसोबत सध्या बांगलादेशात घडतायत. आरक्षणावरून बांगलादेशात यादवी सुरू असताना यात मात्र अल्पसंख्यांक हिंदू भरडला जातोय.

बांगलादेश आणि भारताचे सांस्कृतिक संबंध हजारो वर्षांचे आहेत. मात्र, 1947 च्या फाळणीनंतर हा भाग भारतापासून विभक्त झाला आणि इथल्या मूळ संस्कृतीला ओहोटी लागली. कित्येक वर्षांचा भारतीय संस्कृतीचा इतिहास पाशवी मनोवृत्तीच्या विध्वंसांकडून पायदळी तुडवला गेला.. बांगलादेशच्या इतिहासात रक्त, अब्रू आणि मूळ संस्कृतीचे पाट वाहून गेले आणि उरले ते फक्त भग्न अवशेष. आता पुन्हा याच इतिहासाची पुनरावृत्ती होतेय.

पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर त्या भारताच्या आश्रयाला आल्यात..त्यामुळे बांगलादेशी जनतेनं अल्पसंख्याक हिंदूंना लक्ष्य केलंय. बांगलादेशच्या खुलना विभागात असलेल्या मेहेरपूरमधील इस्कॉन मंदिराची तोडफोड करून आग लावण्यात आली. इस्लामवाद्यांनी नरसिंगडी जिल्ह्यातील कांडीपारा गावात काली माता मंदिरावर देखील हल्ला झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT