बांगलादेशमध्ये १९९१ नंतर तब्बल ३५ वर्षांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत सत्ताधारी आणि पंतप्रधान तारिक रहमान यांचा पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे उमेदवार मिर्जा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी मोठा विजय मिळवला. त्यांच्या रुपानं बांगलादेशला नवे राष्ट्रपती मिळाले.
बांगलादेशात ३५ वर्षांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले. BNP चे उमेदवार मिर्जा फखरुल इस्लाम आलमगीर आणि कर्नल (निवृत्त) ओली अहमद यांच्यात थेट लढत होती. शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर, तसेच आवामी लीगवर बंदी घातल्यानंतर या निवडणुकीकडे देशातील नागरिकांचे लक्ष लागले होते. आता राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचा निकाल लागला असून, मिर्जा फखरुल इस्लाम आलमगीर हे बांगलादेशचे नवे राष्ट्रपती झाले आहेत.
बांगलादेशात राष्ट्रपतिपदासाठी झालेल्या निवडणुकीत बीएनपीचे मिर्जा फखरुल इस्लाम आलमगीर यांना २५५ मते मिळाली. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, त्यांनी विरोधी उमेदवार कर्नल (निवृत्त) ओली अहमद यांना पराभूत केलं. ओली अहमद यांना निवडणुकीत ८८ मते मिळाली. ते लिबरल डेमोक्रेटिक पार्टीचे (LDP) चे अध्यक्ष असून, निवडणुकीत जमात ए इस्लामीच्या नेतृत्वात ११ विरोधी पक्षांच्या आघाडीचे ते उमेदवार होते.
रिपोर्टनुसार, सन १९९१ नंतर म्हणजेच तब्बल ३५ वर्षांनी पहिल्यांदाच राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत थेट लढत बघायला मिळाली. त्यापूर्वी बांगलादेशात सर्वसाधारणपणे सर्वसंमतीने राष्ट्रपतिपदी बिनविरोध निवड करण्यात येत होती. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या नीकटवर्तीय मोहम्मद शहाबुद्दीन यांनी राष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला होता. शहाबुद्दीन यांनी ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच आरोग्यविषयक समस्यांचे कारण देत बांगलादेशच्या राष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला होता.
बांगलादेश निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपतिपदासाठी झालेल्या निवडणुकीत ३४९ नोंदणीकृत मतदारांपैकी ३४३ जणांनी मतदान केले. तसेच सहा खासदारांनी मतदान केले नाही. ७८ वर्षीय मिर्जा फखरुल इस्लाम आलमगीर हे शुक्रवारी, २१ ऑगस्टला बंगभवनच्या दरबार हॉलमध्ये बांगलादेशचे नवे राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.