Municipal Election Results  
देश विदेश

Election Result : बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या, त्यातही काँग्रेसचा दारूण पराभव, फक्त २ जागा जिंकल्या

Municipal Election Results : आसाममधील सिलचर महापालिका निवडणुकीत भाजपने ३२ जागांवर विजय मिळवला, तर काँग्रेसला केवळ २ जागा मिळाल्या. मतपत्रिकेवरही काँग्रेसचा पराभव झाल्याचा टोला मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमांनी लगावला.

Namdeo Kumbhar

Congress defeat in Assam municipal election : राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसकडून SIR आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे. ईव्हीएम घोटाळा करून भाजपने विजय मिळवल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत आहे. पण बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीतच काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे.

आसाममध्ये बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. आसाममधील महापालिकेसाठी बॅलेट पेपर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला अवघ्या २ जागांवर समाधान मानावे लागले, तर भाजपने तब्बल ३२ जागांवर दणदणीत विजय मिळवला. यावरून भाजपचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.

निकाल काय लागला?

सिलचर महापालिकेतील ४२ पैकी ४० प्रभागांसाठी ३ ऑक्टोबर रोजी मतदान पार पडले. प्रभाग क्रमांक ९ आणि २० मध्ये भाजपचे उमेदवार बिजेंद्र प्रसाद सिंह व भक्ती सेन यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीत भाजपने ३२ जागा जिंकल्या, तर आसाम गण परिषदेने २ जागांवर विजय मिळवला. काँग्रेसला केवळ २ जागा मिळाल्या आणि अपक्ष उमेदवारांनी ६ जागांवर बाजी मारली.

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांनी एका जाहीर सभेत काँग्रेसवर टीका केली. "आजच्या आधुनिक युगातही काँग्रेस मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची मागणी करत आहे, यावरूनच त्यांच्या मनातील पराभवाची भीती स्पष्ट दिसते," असा टोला त्यांनी लगावला. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, काँग्रेस मतपत्रिकेवरही हरली; किंबहुना मतपत्रिकेवर त्यांचा अधिक दारूण पराभव झाला. "लोक ईव्हीएमवर 'नोटा' (NOTA) बटण दाबतात, काही लोक मशीन पाहून घाबरतात आणि कधीकधी चुकीचे बटण दाबतात. मात्र, मतपत्रिकेवर मतदान कसे करायचे हे लोकांना नीट ठाऊक आहे. त्यामुळे जोपर्यंत मतपत्रिकेवर निवडणुका होतील, तोपर्यंत काँग्रेसचा असाच दारूण पराभव होत राहील," असेही त्यांनी स्पष्ट केले.

सिलचरमध्ये अल्पसंख्याकांसाठी १० जागा राखीव होत्या. या जागांवर काँग्रेसला विजयाची संधी होती, परंतु त्यांना एकाही जागेवर यश मिळाले नाही. काँग्रेसला केवळ २ जागा मिळाल्या, तर ५ अपक्ष उमेदवार निवडून आले. त्यामुळे या निवडणुकीत पहिल्या क्रमांकावर भाजप-एजीपी (AGP) युती, दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष आणि तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस फेकली गेली, असे हिमंता बिस्वा म्हणाले.

काँग्रेसची मतपत्रिकेची मागणी

'इंडिया' आघाडीने ईव्हीएमऐवजी पुन्हा मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची मागणी करायला हवी, असे विधान ३० सप्टेंबर रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले होते. निवडणूक प्रक्रियेवर जनतेचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच ईव्हीएमऐवजी मतपत्रिका, तरुण व पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांसाठी सोपी नोंदणी प्रक्रिया आणि सर्व राजकीय पक्षांचा विश्वास संपादन करू शकेल असा निवडणूक आयोग असावा, अशी मागणीही त्यांनी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दादांच्या जाण्याने माझ्या घरावर आभाळ कोसळलं-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

Milk Storage Tips: फ्रिजमध्ये दूध किती दिवस चांगले राहते? दूध खराब झाल्यास कसे ओळखायचे? जाणून घ्या योग्य पद्धत

Heart attack: हार्ट अटॅक येण्याआधी शरीर देतं हे ५ संकेत; ॲसिडिटी आणि थकवा समजून दुर्लक्ष केल्यास पडेल महागात

Shiv Sena Case live: शिवसेना पक्ष अन् चिन्ह कुणाचे? सुप्रीम कोर्टातून महत्वाची माहिती समोर; वाचा नेमकं काय घडलं?

Rent Agreement ते घर खाली करेपर्यंत; भाडेकरूंसाठी ६ नवे नियम, आताच घ्या जाणून

SCROLL FOR NEXT