Badrinath helicopter crash 
देश विदेश

Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेले हेलिकॉप्टर कोसळले; दुर्घटनेत ६ भाविकांचा मृत्यू, Video आला समोर

Badrinath helicopter crash : उत्तराखंडमधील बद्रीनाथहून डेहराडूनला निघालेले VT-HCX हेलिकॉप्टर काही वेळातच रडारवरून गायब झाले आणि नंतर कोसळल्याची माहिती समोर आली. या दुर्घटनेत पायलटसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

Namdeo Kumbhar

Badrinath Helicopter Crash : उत्तराखंडमधील बद्रीनाथहून डेहराडूनच्या दिशेने निघालेले हेलिकॉप्टर अचानक रडारवरून गायब झाले आहे. हे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर आले आहे. या दुर्घटनेत पायलटसह ६ जणांचा मृत्यू झाला आहे. खराब हवामानामुळे हे हेलिकॉप्टर कोसळल्याचं रिपोर्ट्सनुसार सांगण्यात येत आहे. (Badrinath to Dehradun helicopter crash latest news)

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार ट्रान्स भारत एव्हिएशनचे VT-HCX हे हेलिकॉप्टर शुक्रवारी दुपारी १:१२ वाजता बद्रीनाथहून डेहराडूनसाठी निघाले होते. त्यानंतर थोड्याच वेळात ते बेपत्ता झाले. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ट्विटरवरील एका पोस्टमध्ये या अपघाताला दुजोरा दिला. धामी यांनी अपघाताविषयी लिहिले की, "बचावकार्य सुरू करण्यात आले आहे."

मिळालेल्या माहितीनुसार, बद्रीनाथ मंदिराहून परतणारे हेलिकॉप्टर जोशीमठ परिसरात अचानक बेपत्ता झाले. मिळालेल्या माहितीनुसार, हे हेलिकॉप्टर बद्रीनाथहून उड्डाण करून परत येत होते. दरम्यान, जोशीमठच्या मारवाडी भागाजवळील चाय गावाच्या टेकडीजवळ हेलिकॉप्टरशी संपर्क तुटला. हेलिकॉप्टर कोसळल्याची भीती व्यक्त केली जात आहे. चमोलीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विवेक प्रकाश यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी एक प्रशासकीय पथक पाठवण्यात आले आहे. हेलिकॉप्टरचा शोध घेण्यासाठी परिसरात शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News: मोठी बातमी! शिंदेसेनेच्या बड्या नेत्याला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

Water Bottle Designs Secrets: पाण्याच्या बाटल्यांवर नागमोडी रेषा का असतात? जाणून घ्या यामागचे नेमके कारण

दुष्काळग्रस्तांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सुका चारा अन् मुरघासाचे दर निश्चित

Maharashtra News Live Update: टाइगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील १२व्या आरोपीला हरियाणातून अटक

Poverty Reduction: भारताने करून दाखवलं! १२ वर्षांत ५० कोटी लोक गरिबीतून बाहेर, वर्ल्ड बँकेचा रिपोर्ट

SCROLL FOR NEXT