Oyo Saam Tv News
देश विदेश

Viral News: ..नो रोमान्स, ही रिक्षा आहे ओयो नाही.. ऑटो ड्रायव्हरची त्या कपल्ससाठी वॉर्निंग देणारी पाटी, चर्चा तर होणारच!

Auto Rickshaws Sign to Couples: ओयो हॉटेल्समध्ये अविवाहीत जोडप्यांना प्रवेश दिला जाणार नाही आहे. अशी बातमी वाऱ्यासारखी पसरताच एका ऑटोमध्ये लावलेली पाटी सध्या चर्चेत आहे.

Bhagyashree Kamble

ओयो हॉटेल्समध्ये अविवाहीत जोडप्यांना प्रवेश दिला जाणार नाही. अशी बातमी वाऱ्यासारखी पसरताच एका ऑटोमध्ये लावलेली पाटी सध्या चर्चेत आहे. एका प्रवाशानं रिक्षातील पाटीचा फोटो एक्सवर शेअर केला आहे. या पाटीचा फोटो सध्या व्हायरल झाला असून, या पाटीवर 'नो रोमान्स' म्हणत रिक्षा चालकानं जणू प्रेमी युगुलांना थेट इशारा दिला आहे.

ओयो हॉटेल्सवर अविवाहीत प्रेमी युगुलांना बंदी घातल्यापासून, ओयो या बँडची सोशल मीडियात प्रचंड चर्चा होत आहे. त्यानंतर रिक्षा चालकाने त्याच्या ऑटोमध्ये लावलेली पाटी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या पाटीवर 'नो रोमान्स' या शब्दाचा उल्लेख करत, प्रवाशांना रोमान्स करण्यास मनाई आहे, असा थेट इशारा रिक्षा चालकानं दिला आहे. ही व्हायरल पाटी पाहून आपण देखील रिक्षा चालकाच्या चाणाक्ष बुद्धीचे कौतुक कराल.

व्हायरल ऑटोमधील ही पाटी चांगलीच चर्चेत आली आहे. पाटीच्या वरच्या भागावर वॉर्निंग हा शब्द मोठ्या आणि ठळक अक्षरात लिहिलेले आहे. नंतर खालच्या बाजूला 'खबरदार, नो रोमान्स, ही ऑटो आहे, तुमची खासगी जागा किंवा ओयो नाही. कृपया सुरक्षित अंतर ठेवा आणि शांत बसा. आदर द्या आणि आदर मिळवा. धन्यवाद' असं पाटीवर लिहिण्यात आलं आहे.

ऑटोमधील ही पाटी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली असून, नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना रिक्षाचालकाचे स्पष्टवक्तेपणा आवडला आहे. तर काहींना रिक्षा चालकानं प्रवाशांना दिलेला हा थेट इशाराची स्टाईल आवडली आहे. एका युजरनं म्हटलं की, 'ऑटोमध्ये रिक्षाचालकाला पाटी लावण्याची वेळ आली, म्हणजे या रिक्षात कितीवेळा असे घडलं असेल'. सध्या ही पाटी व्हायरल झाली असून, सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT