US President news  Saam tv
देश विदेश

उपराष्ट्राध्यक्षांच्या घरावर हल्ला, खिडकींच्या काचा फुटल्या; संपूर्ण अमेरिकेत खळबळ

US President news : उपराष्ट्राध्यक्षांच्या घरावर हल्ला झाल्याची घटना घडलीये. अज्ञात व्यक्तीने घरात घुसून खिडकींच्या काचा फोडल्या.

Saam Tv

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्षावर घरावर हल्ला

जेडी वेन्स असे उपराष्ट्राध्यक्षांचे नाव

घटननेने अमेरिकेत खळबळ

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स यांच्या घरावर हल्ला झाला आहे. जेडी वेन्स यांच्या घरावर दगडफेक झाल्यानंतर खिडकीच्या काचा देखील फुटल्या. त्यांचं घर वॉशिंग्टन डीसीपासून दूर आहे. एक अज्ञात व्यक्ती अचानक घरात घुसला. त्यानंतर त्याने तोडफोड केली. या घटनेने संपूर्ण अमेरिकेत खळबळ उडाली आहे.

'सीएनएन'च्या मीडिया रिपोर्टनुसार, उपराष्ट्राध्यक्ष ओहायो येथील घरावर हल्ला झाल्यावर सीक्रेट सर्व्हिस आणि स्थानिक पोलिसांनी हल्ल्यानंतर तातडीने कारवाई केली. या प्रकरणात स्थानिक पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हल्लेखोराचा हल्ला करण्यामागचा उद्देश काय होता, याचा तपास पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स यांनी व्हेनेझुएलावर सैनिकांनी केलेल्या हल्ल्याचं समर्थन केलं होतं. व्हेनेझुएलामध्ये ड्रग्स तस्करी देखील होते, असेही त्यांनी म्हटलं होतं. तेलाच्या व्यापारातून मिळणाऱ्या पैशांचा वापर ड्रग्स तस्करीत होतो, असा दावा देखील त्यांनी केला होता. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, 'व्हेनेझुएलाचा ड्रग्सशी जास्त संबंध नाही. परंतु हे ड्रग्स दुसऱ्या ठिकाणाहून येते. फेंटानिल जगातील एकमात्र ड्रग्स नाही. व्हेनेझुएलातून फेंटानिल कमी प्रमाणात येते'.

अमेरिकेचे उपाराष्ट्राध्य जेडी वेन्स यांनी पोस्टमध्ये पुढे म्हटलं होतं की, 'कोकीन हा व्हेनेझुएलातून तस्करी होणारा मुख्य ड्रग्स आहे. ड्रॅग्स हे लॅटिन अमेरिकेतील सर्व कार्टेल्ससाठी नफ्याचं केंद्र आहे. त्यांनी कोकेनमधून मिळणारा पैसा संपवलाय. हे कार्टेल्सना कमकुवत करण्याचं काम करताहेत'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: विद्यार्थ्यांना घेऊन जणारी बस दरीत कोसळली, २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

'सिनेमॅटिक' रिलवरून वाद पेटला; चमकेश तहसीलदार प्रतीक्षा तेजनकरांच्या निलंबनाची मागणी

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

SCROLL FOR NEXT