Satyendra Jain Saam Tv
देश विदेश

ईडीची दिल्लीतही कारवाई; केजरीवाल सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांची मालमत्ता जप्त

केजरीवाल सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन (Satyendra Jain) आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुमारे 5 कोटी स्थावर मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त करण्यात आल्या आहेत.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली : दिल्लीतील आम आदमी पक्षाचे (AAP) नेते आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. एका जुन्या प्रकरणात मनी लाँड्रिंग प्रकरणात सीबीआयने ही कारवाई केली आहे. त्यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता असल्याचा आरोप आहे. केजरीवाल सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन (Satyendra Jain) आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुमारे 5 कोटी स्थावर मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त करण्यात आल्या आहेत.

सीबीआयने (CBI) ऑगस्ट २०१७ मध्ये गुन्हा नोंदवला होता आणि नंतर हे प्रकरण ईडीकडे (ED) दिले होते. सत्येंद्र जैन हे आम आदमी पक्षाचे नेते आहेत. त्यांच्याकडे दिल्ली सरकारमधील आरोग्य, ऊर्जा, गृह, सार्वजनिक बांधकाम विभाग, उद्योग, शहरी विकास, पूर, पाटबंधारे आणि जल विभाग आहेत.

जैन यांनी २०१८ च्या अगोदर पाच वर्षांत दिल्लीतील शेतजमीन आपल्या नियंत्रित कंपन्यांच्या नावावर खरेदी केली होती. या कंपन्यांमध्ये जैन एकतर संचालक होते किंवा या कंपन्यांचे एकतृतीयांश समभाग स्वत:च्या नावावर किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या किंवा इतरांच्या नावावर असल्याचा आरोप करण्यात आला होता. दिल्लीतील औचंडी, बवाना, कराला आणि मोहम्मद मजवी गावात जमीन खरेदी करण्यासाठी या पैशांचा वापर करण्यात आला होता.असा दावा सीबीआयने (CBI) केला आहे.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT