Rahul Gandhi Latest Marathi News Saam Tv
देश विदेश

Rahul Gandhi News: राहुल गांधींसह काँग्रेसच्या नेत्यांविरोधात गुन्हा; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पोलिसांची कारवाई

Congress Bharat Jodo Yatra News: भारत जोडो न्याय यात्रेवर निघालेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Satish Daud

Rahul Gandhi Latest Marathi News

भारत जोडो न्याय यात्रेवर निघालेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आसाम पोलिसांनी मंगळवारी (२३ जानेवारी) रात्री ही कारवाई केली आहे. राहुल गांधी यांच्यावर चिथावणीखोर भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामुळे काँग्रेस आणखीच आक्रमक होण्याची शक्यता आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो न्याय यात्रा आसाममध्ये आहे. यादरम्यान, राहुल गांधी सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्लाबोल करीत आहेत. आसाममध्ये सध्या भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा समरा आणि राहुल गांधी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमकी घडत आहे.

मुख्यमंत्री सरमा यांच्या नेतृत्वाखाली आसामची अवस्था बिकट झाली आहे. तरुणांना रोजगार मिळत नसून शेतकरी त्रस्त आहेत. आता भाजपकडून आसाममध्ये न्याय यात्रेत अडथळे आणले जात आहेत. मी ज्या कुणाबरोबर बोलतोय, तो मुख्यमंत्र्यांबाबत तक्रार करत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, मंगळवारी सकाळच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये चांगलीच झटापट झाली होती. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. या घटनेची मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांनी गंभीर दखल घेत राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांवर एफआयआर दाखल करा, असे आदेश पोलिस महासंचालकांना दिले होते.

मुख्यमंत्री बिस्वा सरमा यांच्या आदेशाने आता पोलिसांनी राहुल गांधी, के.सी. वेणुगोपाल, कन्हैय्याकुमार यांच्यासह काँग्रेस अनेक नेत्यांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. कलम 120 (बी) 143/147/188/283/427 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री बिस्वा यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भांडुपमधील एका सार्वजनिक शौचालयात सापडलं स्त्री जातीचं अर्भक

Election Commission: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत

Hair Care: हेल्दी आणि शायनी केस हवेत? मग 'हा' पदार्थ नक्की ट्राय करा, आठवड्याभरात दिसेल फरक

Fodnicha Bhat Recipe : ऑफिसवरून आल्यावर झटपट बनवा 'असा' चटपटीत फोडणीचा भात, आवडीने खातील सगळे

Gold Price: मागच्या वर्षीचा सोन्याचा दर काय होता?

SCROLL FOR NEXT