UP Elections 2027 owaisi and chandrashekhar azad announce new alliance Saam TV
देश विदेश

UP Elections : विधानसभा निवडणुकीआधी पहिली ठिणगी; भाजपला पर्याय तिसऱ्या आघाडीचा; मुख्यमंत्रि‍पदाचा चेहराही ठरला

UP Elections 2027 owaisi and chandrashekhar azad announce new alliance : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीआधी ओवैसी यांच्या आणि चंद्रशेखर आझाद यांनी सामाजिक परिवर्तन मोर्चाची घोषणा केली. याशिवाय मुख्यमंत्रि‍पदाचाही चेहरा जाहीर करण्यात आला.

Nandkumar Joshi

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२७ मध्ये होणार आहे. त्याआधीच येथील रण तापलं आहे. उत्तर प्रदेशच्या राजकारणात आणखी एका आघाडीची घोषणा करण्यात आली आहे. एआयएमआयएम (AIMIM) चे असदुद्दीन ओवैसी आणि आझाद समाज पार्टी (कांशीराम) चे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी सामाजिक परिवर्तन मोर्चाची घोषणा केली. सत्ताधारी भाजपला सामाजिक परिवर्तन मोर्चाच्या रुपानं बळकट पर्याय असल्याचं आझाद आणि ओवैसी यांनी सांगितलं.

ओवैसी आणि आझाद यांनी आघाडीची घोषणा केली. ही तिसरी आघाडी नसून पहिली मजबूत आघाडी आहे, असं आझाद म्हणाले. मोठ्या आघाडीत सहभागी होण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण त्याला कमकुवत समजलं गेलं. आता आम्ही अपमान सहन करणार नाही. भाजपला पराभूत करण्यासाठी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसनेही या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन आझाद यांनी केले.

असदुद्दीन ओवैसी यांनी चंद्रशेखर आझाद हे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, अशी घोषणा केली. राज्यात भाजपला रोखण्यासाठी सामाजिक परिवर्तन मोर्चा हा मजबूत पर्याय असेल, असेही ते म्हणाले. आतापर्यंत त्यांच्या समाजातील लोकांचा वापर फक्त मतदार म्हणून करण्यात आला आहे, असे सांगतानाच आता ही आघाडी आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न असेल, असेही त्यांनी सांगितले. सामाजिक परिवर्तन मोर्चा राज्यातील सर्वच्या सर्व जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

या आघाडीची घोषणा होताच उत्तर प्रदेशच्या राजकारणात नवं समीकरण तयार होण्याची शक्यताही वाढली असल्याचे मानले जाते. आगामी विधानसभा निवडणुकीत हा मोर्चा किती प्रभावी ठरतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची शिवसेना विलीन होणार, भाजप नेत्याचा खोचक दावा

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुरटी का ठेवतात?

Maharashtra News Live Update: सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष पदाची 18 नोव्हेंबर रोजी होणार निवड

Central Government : कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकारी पैशात मिळणार १.८ लाखांपर्यंत लॅपटॉप, पात्रता काय? वाचा

Fridge Vastu: देव्हाऱ्याच्या बाजूला फ्रिज ठेवणं अशुभ? फ्रीजजवळ कोणत्या गोष्टी ठेऊ नयेत, वास्तुशास्त्रात सांगितलेत नियम

SCROLL FOR NEXT