Airplane Crash Saam Tv News
देश विदेश

Plane accident: विमानतळावर २ विमानांची टक्कर, एकाचा मृत्यू, ४ जण जखमी; विमानाचा झाला चकणाचूर

Scottsdale airport jet collision: अॅरिझोनातील स्कॉट्सडेल विमानतळावर दोन खाजगी विमाने एकमेकांना आदळली आहेत. या विमान अपघातात एकाचा मृत्यू तर, ४ जण जखमी आहेत. तर आणखी एक जण विमानात अडकल्याची माहिती समोर आली आहे.

Bhagyashree Kamble

अमेरिकेत विमान अपघातांची मालिका सुरूच आहे. अमेरिकेतून आणखी एक विमान अपघाताची बातमी समोर येत आहे. अॅरिझोना राज्यातील स्कॉट्सडेल विमानतळावर दोन खाजगी विमाने एकमेकांना आदळली आहेत. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, चार जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. तर, एक व्यक्ती विमानात अजून अडकली आहे. त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी बचाव पथकाडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहे.

उभ्या असलेल्या विमानाशी झाली टक्कर

प्लॅनिंग अँड आऊटरीच कोऑर्डिनेटर केली कुएस्टर यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कॉट्सडेल विमानतळावर १० फेब्रुवारीला विमानाचा भीषण अपघात घडलाय. एक बिझनेस जेट धावपट्टीवरून घसरले आणि उभ्या असलेल्या एका खासगी जेटला जाऊन आदळले. हे विमान टेक्सास येथून येत होते. त्यामध्ये ४ जण प्रवास करत होते. तर, उभ्या असलेल्या विमानात एक व्यक्ती होती.

अपघातात एकाचा मृत्यू अनेक जण जखमी

अॅरिझोनातील स्कॉट्सडेल अग्निशमन विभागाचे कॅप्टन डेव्ह फोलिओ म्हणाले, या भीषण अपघातात एकाचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे. तसेच चार जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. तर, एक व्यक्ती अजूनही विमानामध्ये अडकल्याची माहिती आहे. बचाव पथकाकडून त्याला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहे.

सर्व उड्डाणे रद्द

हा विमानतळ फिनिक्स परिसरातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या खासगी विमानांसाठी एक महत्त्वाचे केंद्र आहे. अपघातानंतर स्कॉट्सडेल विमानतळावरील धावपट्टी सध्या बंद आहे. गेल्या १० दिवसांत अमेरिकेत झालेला हा चौथा विमान अपघात आहे. या आधी झालेल्या विमान अपघातात ३७ जणांचा मृत्यू झाला होता. तर, ३१ जानेवारीला फिलाडेल्फिया येथे झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samriddhi Yojana: ₹1.5 लाख गुंतवा अन् ₹71.82 लाख मिळवा! जाणून घ्या कन्या सुकन्या समृद्धी योजनेचे गणित

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

पूर्ण फी भरली, तरी प्रशिक्षण नाही! VLCC विरोधात मनसेचा धडक मोर्चा

BJP News: भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळली; तावडेंना मुंबई अध्यक्षांनी थेट सुनावलं, नगरसेवकांनाही आरसा दाखवला

SCROLL FOR NEXT