West Bengal Crime News in Marathi, Latest crime news  Saam Tv
देश विदेश

मुलीच्या मृत्यूनंतर संताप अनावर; जावयाला रुग्णालयासमोरच चप्पलने मारहाण!

पश्चिम बंगालमधील (West Bengal Crime News) पूर्व वर्धमान जिल्ह्यातील रुग्णालयात मयत महिलेच्या संतप्त कुटुंबीयांनी शवागाराच्या बाहेर गोंधळ घातल्याची घटना घडली आहे.

वृत्तसंस्था

पश्चिम बंगालमधील (West Bengal Crime News) पूर्व वर्धमान जिल्ह्यातील रुग्णालयात मयत महिलेच्या संतप्त कुटुंबीयांनी शवागाराच्या बाहेर गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. यामागील कारण असे आहे की, आपल्या मुलीच्या मृत्यूचा राग अनावर होऊन संतप्त कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या शवागारात मुलीच्या सासरच्या मंडळींनी बेदम मारहाण केली आहे. (West Bengal Crime News in Marathi)

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी नंदई रेल्वे लाईनजवळ शर्मिला रुईदास नावाच्या महिलेचा मृतदेह सापडला होता. यानंतर मृताचे नातेवाईकही हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि सासरच्या मंडळींवर ते खुनाचा आरोप करू लागले. शर्मिलाचे सासरचे लोक तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

शवागाराबाहेर सासरच्या मंडळींना मारहाण!

मृत महिलेच्या कुटुंबीयांना एवढा राग आला की, त्यांनी मृत मुलीच्या पतीला शवागाराबाहेर नेऊन बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर मृताच्या सासरच्या मंडळींनाही चप्पलने मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे.

हे देखील पाहा-

तर, नातेवाईकांचा आरोप आहे की, मृताचा पती बनेश्वर दास हा अनेकदा दारू पिऊन घरी यायचा आणि पत्नीला मारहाण करायचा. मारहाणीनंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली. यावेळी उपस्थित पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. तर, सध्या महिलेच्या पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहिली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस, प्रकृती खालावली

कोकणात भाजपमध्ये मोठी 'इनकमिंग'; रवींद्र चव्हाणांचे पदाधिकाऱ्यांना कडक निर्देश

Throat Cancer : गरमा गरम चहा प्यायल्याने घशाचा कॅन्सर होऊ शकतो का? जाणून घ्या

Traffic challan: गाडीवर दंड आहे? 12 सप्टेंबरला मिळणार मोठी सूट; कमी पैशांत भरता येणार ई-चलान

Friday Horoscope: आज नात्यातील गैरसमज दूर होतील, हाती पैसाही येईल! वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT