Sexual Assault Saam Tv
देश विदेश

आंध्र प्रदेश: रेल्वे स्टेशनवर पती आणि मुलांसमोर गर्भवतीवर सामूहिक बलात्कार, पैसेही लुटले!

आंध्र प्रदेशमध्ये पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. रेल्वे स्थानकावर पीडितेचा पती आणि मुले त्यांच्या डोळ्यांसमोर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.

वृत्तसंस्था

आंध्र प्रदेश: आंध्र प्रदेशमध्ये पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. रेल्वे स्थानकावर पीडितेचा पती आणि मुलांच्या डोळ्यांसमोर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.

याबद्दल बापटला जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक वकुल जिंदाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाशम जिल्ह्यातील यारागोंडा भागातील एक महिला आपल्या पती आणि मुलांसह रात्री 11.30 वाजता रेपल्ले रेल्वे स्थानकावर ट्रेनमधून खाली उतरली. मध्यरात्रीमुळे त्यांना स्थानकातून नागाईलंकाला जाण्यासाठी कोणतीही बस मिळत नव्हती. त्यामुळे रेल्वे स्थानक सुरक्षित असल्याचे समजून ते फलाटाच्या बाकावर झोपले होते.

रात्री एक वाजता दारूच्या नशेत तिघेजण त्याच्याकडे आले. त्याने आधी पीडितेकडे ठेवलेले 750 रुपये हिसकावले, त्यानंतर त्यांनी महिलेच्या पतीला खूप मारहाण केली. त्यानंतर. महिलेला तिच्या केसांनी ओढले आणि तिच्यावर बलात्कार केला.

पती मदतीची याचना करत राहिला...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा पती मदतीची याचना करत होता. घटनेच्या वेळी प्लॅटफॉर्मवर इतर दोन महिलाही होत्या, मात्र, त्यांनी मदत करण्यास नकार दिला. त्यानंतर त्याने स्टेशनबाहेर धाव घेतली, काही अंतरावर असलेल्या पोलिस चौकीत पोलिसांची मदत घेतली, रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर पोहोचेपर्यंत मात्र तिघेही आरोपी फरार झाले होते.

तिन्ही आरोपींना अटक;

पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल करून श्वानपथकाच्या मदतीने काही तासांतच तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. एक आरोपी विजयकृष्ण (२४), टाईल्सचे काम करणारा, दुसरा आरोपी निखिल (२५), तिसरा आरोपी अल्पवयीन असून, त्याच्यावर यापूर्वीही चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या तिन्ही आरोपींनी पीडितेच्या कुटुंबाला मारहाण करून महिलेवर सामूहिक बलात्कार केला. रेल्वे स्थानकावरील सामूहिक बलात्काराचे प्रकरण देशभर चर्चेचा विषय बनला असून आता स्थानकांवरही महिला सुरक्षेचा विषय निर्माण होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT