CM Jagan Reddy saam tv
देश विदेश

AP: उच्च न्यायालयाचा ३ राजधान्यांवर निकाल; मुख्यमंत्री रेड्डींना धक्का

राजधानीच्या गरजेशिवाय अन्य कशासाठीही जमीन दिली नाही असेही न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले आहे.

साम न्यूज नेटवर्क

आंध्रप्रेदश : मुख्यमंत्री जगन रेड्डी (CM Jagan Reddy) यांना न्यायालयाच्या निकालामुळे नुकताच अनपेक्षित धक्का बसला आहे. उच्च न्यायालयाने (high court) एपी, सीआरडीएमधील तीन राजधान्या रद्द करण्याबाबतचा निकाल दिल्याने मुख्यमंत्री आणि त्यांचे समर्थकांमध्ये खळबळ माजली आहे. अमरावतीला राजधानी (amravati capital of Andhra Pradesh म्हणून विकसित करण्याचे प्रमुख निर्देश न्यायालयाने जारी केले आहेत.

आंध्र प्रदेश (andhra pradesh) राज्य सरकारने CRDA कायद्यानुसार काम करावे. करारानुसार ६ महिन्यांत विकास. तीन महिन्यांत विकसित भूखंड शेतकर्‍यांना द्यावेत. शेतकर्‍यांना सर्व सुविधांसह विकसित भूखंड देण्याबराेबरच विकासकामांबाबतचा अहवाल न्यायालयाला वेळोवेळी द्यावेत असे आदेश न्यायालयाने दिले. राजधानीच्या गरजेशिवाय अन्य कशासाठीही जमीन दिली नाही असेही न्यायालयाने (court) राज्य सरकारला फटकारले आहे.

याचिकांच्या खर्चासाठी ५० हजार रुपयांची मागणी करणा-या काही न्यायाधीशांनी दाखल केलेली याचिका आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या. विधानसभेला राजधानीवर निर्णय घेण्याचे आणि कायदे करण्याचा अधिकार नाही, असा निकाल उच्च न्यायालयाने दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Papad Recipe : उन्हाळा आलाय; पापड लाटण्याचे टेन्शन कशाला? झटपट बनवा तांदळाचे पळी पापड, वाचा रेसिपी

MNS : राज ठाकरेंच्या उपस्थितीत ३ प्रसिद्ध मराठी कलाकारांचा मनसेत प्रवेश, राजकीय प्रवास सुरू

धक्कादायक! तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराजांचा आत्महत्येचा प्रयत्न; स्वत:वरच केले वार

Cabbage Thalipeeth Recipe: सकाळी नाश्त्याला बनवा गरमागरम कोबीचे खुसखुशीत थालीपीठ, सोपी आहे रेसिपी

Rain Alert : महाराष्ट्राला अवकाळी पाऊस झोडपणार, ९ जिल्ह्यांना अलर्ट, वाचा पाऊस कुठे धो धो कोसळणार?

SCROLL FOR NEXT