धक्कादायक : मुलीच्या वडिलांचा लग्नाला नकार, संतप्त तरुणाने केला गोळीबार; डोक्यात गोळी लागल्याने वडिलांचा मृत्यू  SaamTV
देश विदेश

धक्कादायक : मुलीच्या वडिलांचा लग्नाला नकार, संतप्त तरुणाने केला गोळीबार; डोक्यात गोळी लागल्याने वडिलांचा मृत्यू

शौकीनच्या मुलीला इम्तियाज नावाचा तरुण सतत फोन करून त्याच्या छळ करायचा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिल्ली : दिल्लीतील (Delhi) दयालपूर भागात लग्नास नकार दिल्याने एका संतप्त तरुणाने मुलीच्या वडिलांवर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना समोर आली असून ही हत्या करुन आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना जमावाने बेदम मारहाण केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं.

मृत शौकीन हा दयालपूरच्या मुस्तफाबाद भागात आपल्या कुटुंबासह राहतो. तो भंगार विकायचा शौकीनच्या मुलीला इम्तियाज नावाचा तरुण सतत फोन करून त्याच्या छळ करत असे. इम्तियाज याला अनेक वेळा समजावूनही तो ऐकत नव्हता, तो त्या मुलीशी लग्न करणार असं सांगत होता. त्याला अनेक वेळा समज देऊनही तो ऐकत नव्हता.

15 फेब्रुवारी रोजी आरोपी इम्तियाज ही मुलीच्या घरी आला आणि त्याने मुलीच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली धक्कादायक बाब म्हणजे धमकी दिल्याच्या दुसऱ्याच दुवशी म्हणजे 16 फेब्रुवारीला सकाळी तो अचानक मुलीच्या घरी आला आणि त्याने मुलीच्या वडिलांना गच्चीवर बोलण्याच्या बहाण्याने वरच्या मजल्यावर नेले.

दरम्यान आरोपीने मुलीच्या वडिलांना लग्नासाठी अनेक वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी या नात्याला मान्यता दिली नाही. त्यानंतर संतापलेल्या आरोपीने कंबरेतून पिस्तूल काढून पीडितेच्या डोक्यात गोळी झाडली गोळ्यांच आवाज ऐकल्याने स्थनिकांनी तिकडे धाव घेतली असता आरोपी गच्चीवरुन खाली पळताना पडला आणि जमावाच्या तावडीत सापडला त्यांनी त्याला बेदम मारहाण करत पोलिसांच्या (Police) स्वाधीन केलं मात्र मुलीच्या वडिलांच्या डोक्याच्या गोळी लागल्याचे त्यांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुढील २० तासात महाराष्ट्रासह २५ राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; ताशी ७५ किमी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

गणेशोत्सवात 12 दिवस ड्राय डे! मद्यविक्रीला कुठे राहणार बंदी?

MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य; सरकारनं घेतले तीन मोठे निर्णय

देवाभाऊंच्या घरी जरांगेभाऊ जाणार, अमृता फडणवीसांकडून जरांगेंना जेवणाचं आमंत्रण

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील इळेगाव येथे पोलिसांवर वाळू माफियांचा हल्ला

SCROLL FOR NEXT