Delhi School Threat News SAAM TV
देश विदेश

Delhi School Threat : भल्या सकाळी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी, अख्ख्या दिल्लीची झोप उडाली

Delhi School Threat News : देशाची राजधानी दिल्ली येथील आणखी एका शाळेला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे.

Nandkumar Joshi

Delhi School Threat News : देशाची राजधानी दिल्ली येथील आणखी एका शाळेला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. धमकीच्या ई-मेलनंतर दिल्ली पोलीस आणि इतर पथके घटनास्थळी पोहोचले. आजूबाजूच्या परिसरात पाहणी केली जात आहे. यापूर्वीही अनेक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली (Delhi) येथील साकेतच्या पुष्प विहार स्थित अमृता पब्लिक स्कूलमध्ये मंगळवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली. बॉम्बची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली होती. याबाबत माहिती मिळताच पोलीस आणि अन्य पथके घटनास्थळी तात्काळ पोहोचली. (Latest Marathi News)

दिल्लीच्या दक्षिण जिल्हा डीसीपी चंदन चौधरी यांनी सांगितले की, धमकीचा ईमेल आल्यानंतर शाळेत पाहणी सुरू केली. सर्व ठिकाणी कसून चौकशी करण्यात आली. पोलिसांनी झडतीवेळी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. हा मेल कुठून आणि कुणाकडून आला याचा तपास करण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वीच आणखी एक शाळेला धमकी

याआधी डिफेन्स कॉलनीस्थित इंडियन पब्लिक स्कूल आणि डीपीएस मथुरा रोड येथे बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी मिळाली होती. २६ एप्रिलला मथुरा रोड येथील दिल्ली पब्लिक स्कूललाही इमेलद्वारे धमकी दिली होती. शाळा प्रशासनाने ८.१० वाजता नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती देण्यात आली होती. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांचे पथक पोहोचले होते.

१२ एप्रिलला शाळेत बॉम्बची धमकी

त्याआधीही १२ एप्रिल रोजी दक्षिण दिल्लीच्या डिफेन्स कॉलनी पोलीस परिसरात सादिक नगरमध्ये एका शाळेत बॉम्ब ठेवल्याची धमकी प्राप्त झाली होती. त्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. शाळा प्रशासनाकडून पालकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेसेज पाठवून शाळेत येऊन पाल्यांना घेऊन जावे, असे सांगण्यात आले होते. हा मेसेज मिळाल्यानंतर पालकांची शाळेत मोठी गर्दी झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

11 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; दोन डॅशिंग महिला अधिकाऱ्यांना दिली मोठी जबाबदारी

Liver Health : लिव्हर आणि किडनीचं या ७ सवयींमुळे होतं नुकसान; वेळीच सावध व्हा

Hair Fall: शॅम्पू लावताच तुमचे केस गळू लागतात? 'या'५ सवयी ठरतात कारणीभूत

तुरूंगात असताना माझ्यावर विषप्रयोगाचा संशय, राऊतांच्या विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT