Israel Iran War Saam tv
देश विदेश

Israel Iran War : कुछ बडा होने वाला है? इराणचं अण्वस्त्र केंद्र उद्धवस्त होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

israel iran news : इस्त्रायल- इराण युद्धात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणला तेहरान खाली करण्याचा इशारा दिलाय. अमेरिकेनं असा इशारा का दिला? तेहरानमधील फोर्डो अण्वस्त्र प्रकल्पावर मोठा हल्ला होऊ शकतो का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून

Saam Tv

सुप्रीम मस्कर, साम टीव्ही

इस्त्रायल-इराण युद्धाला आता विध्वसंक वळण मिळणार आहे. कारण आता अमेरिकचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची राजधानी तेहरान शहर खाली करा, असा इशारा नागरिकांना दिलाय. ज्यामुळे इराणमधल्या तेहरानमध्ये अमेरिकेकडून मोठा विध्वसंक हल्ला केला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. ट्रम्प यांनी G7 शिखर परिषदेसीठी कॅनडाला जाण्यापूर्वी काय म्हटलं पाहूयात...

ट्रम्पचा इराणला इशारा

इराणची राजधानी असलेले तेहरान शहर खाली करण्याची गरज आहे. अणुकरारावर स्वाक्षरी न करण्याचा इराणचा निर्णय मूर्खपणाचा आहे. इराणनं या करारावर स्वाक्षरी केली पाहिजे होती. ही किती शरमेची बाब आहे आणि मानवी जीवांचा अपव्यय आहे. इराणकडे अणवस्त्रं असता कामा नयेत. मी पुन्हा एकदा सांगतोय, सगळ्यांनी तातडीने तेहरान खाली करा.

या विधानानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी G7 शिखर परिषद सोडून मध्य़ेच अमेरिकेत परतलेत. त्यामुळे पुढील दोन दिवसांत इराणबाबत मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावेळी तेहरान खाली करण्याचा ट्रम्प यांचा इशारा विध्वसंक हल्ल्याचे संकेत देतोय का असा प्रश्न पडलाय.. ट्रम्प यांच्या इशाऱ्यामुळे तेहरानच्या फोर्डो अणु प्रकल्पावर मोठा हल्ला केला जाण्याची शक्यताही वर्तवली जातेय. फोर्डो अणुऊर्जा प्रकल्पाचा इतर देशांनी धस्का का घेतलाय? पाहूयात

फोर्डो अणुऊर्जा प्रकल्प का महत्त्वाचा?

अणू प्रकल्प फोर्डो डोंगराखाली बांधलेला असून लष्करी हल्ल्यांपासून सुरक्षित

फोर्डो प्रकल्पात इराण अण्वस्त्र तयार करत असल्याचा संशय

फोर्डो प्रकल्पात 60 % उच्च दर्जाचं यूरेनियम संवर्धन

2015 च्या अणु करारानंतर काही काळ केंद्र बंद

फोर्डो प्रकल्पामुळे संपूर्ण मध्यपूर्व क्षेत्रात अस्वस्थता आणि धोक्याचं वातावरण

फोर्डो इथल्या अण्वस्त्रांना उद्धवस्त करणं सोपं नाही. त्यासाठी विध्वसंक बंकर बस्टर बॉम्बची आवश्यकता असते.. त्यामुळे अमेरिकन B-2 बॉम्बर्सचं इराणची अण्वस्त्र उद्धवस्त करू शकतात. या B-2 बॉम्बरमध्ये अतिशय घातक MOP बॉम्ब बसवता येतो. हा MOP जमिनीपासून शेकडो फूट खाली बांधलेल्या बंकरलाही नष्ट करण्यास सक्षम असतो. म्हणूनच इस्रायली पंतप्रधान वारंवार अमेरिकेकडून मदत मागत आहेत. त्यात अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरान खाली करण्याचा इशारा दिल्यानं कुछ तो बडा होने वाला है, हे निश्चित.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील काँग्रेस कमिटीमध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा

Jasprit Bumrah Retirement : टीम इंडियाला मोठा हादरा! जसप्रीत बुमराह कसोटीतून निवृत्ती घेणार?

Nashik Food : नाशिकच्या Top 7 डीशेस ज्या पाहताच तोंडाला सुटेल पाणी

Crime News: होम गार्डच्या परीक्षेवेळी तरुणी बेशुद्ध पडली; रुग्णालयात नेताना अ‍ॅम्ब्युलन्समध्येच सामूहिक बलात्कार

Nachni ladoo Recipe: अचानक लागलेल्या भूकेसाठी घरच्या घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी नाचणीचे लाडू

SCROLL FOR NEXT