Joe Biden Security Lapse Saam TV
देश विदेश

Joe Biden Security Lapse : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या सुरक्षेत मोठी चूक; अज्ञात कार ताफ्याला धडकली, पाहा VIDEO

Joe Biden Security Lapse : एका चौकातून पुढे जात असताना एका फोर्ड कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने कार थेट बायडन यांच्या ताफ्यातील वाहनाला धडकली. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या माहितीनुसार, या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही.

प्रविण वाकचौरे

Joe Biden Security Lapse :

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे. जो बायडन यांच्या ताफ्याला एक भरधाव कार धडकल्याची घटना घडली आहे. या जो बायडन आणि त्यांची पत्नी एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात असताना कारने त्यांच्या ताफ्याला धडक दिली. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या माहितीनुसार, या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. (Latest News)

एका चौकातून पुढे जात असताना एका फोर्ड कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने कार थेट बायडन यांच्या ताफ्यातील वाहनाला धडकली. त्यानंतर जो बायडन यांच्या सुरक्षारक्षकांनी कारला घेरलं आणि चालकाला ताब्यात घेतलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या घटनेनंतर राष्ट्राध्यक्ष बायडन यांना सुरक्षारक्षकांना तातडीने घटनास्थळावरुन हलवलं. यावेळी ते वाहनाच्या दिशेने धावताना दिसले. त्यांच्या पत्नी या आधीच कारमध्ये बसलेल्या होत्या. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. मात्र सध्या या घटनेबाबत गुप्तचर यंत्रणेकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT