Breaking News: अफगाणिस्तानच्या ISIS-K तळांवर अमेरिकेचा ड्रोन हल्ला Saam Tv
देश विदेश

Breaking News: अफगाणिस्तानच्या ISIS-K तळांवर अमेरिकेचा ड्रोन हल्ला

काबूल विमानतळावरील हल्ल्याचा अमेरिकेने अवघ्या 48 तासांच्या आत बदला घेतला आहे.

वृत्तसंस्था

काबूल विमानतळावरील हल्ल्याचा अमेरिकेने अवघ्या 48 तासांच्या आत बदला घेतला आहे. अफगाणिस्तानात अमेरिकन लष्कराने हल्ल्यातील गुन्हेगारांवर मोठी कारवाई केली आहे. लष्कराने अफगाणिस्तानातील इसिस-के तळांवर ड्रोन हल्ला केला आहे. काबूल विमानतळावर झालेल्या हल्ल्यात 13 अमेरिकन सैनिक ठार झाले होते. यासोबतच अमेरिकेने लोकांना काबूल विमानतळाचे गेट लवकरात लवकर सोडण्यास सांगितले आहे.

अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले शनिवारी सकाळी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात काबूल विमानतळावर झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटासाठी जबाबदार असलेल्या एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने सांगितले की, पूर्व अफगाणिस्तानमध्ये झालेल्या हल्ल्यात इसिस-के चा एक दहशतवादी ठार झाला आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी गुरुवारी झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटांसाठी इस्लामिक स्टेटला जबाबदार धरले. कडक सुरक्षेच्या दरम्यान अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून लोकांना बाहेर काढण्यात गुंतले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Plant Vastu: सुकलेली तुळस काय संकेत देते? घरातील झाडे सुकण्याचा अर्थ काय?

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

SCROLL FOR NEXT