America crime  saam Tv
देश विदेश

Crime News: अमेरिका पुरती हादरली; घरमालकानं ६ वर्षीय पॅलेस्टिनी मुलाला निर्घृणपणे संपवलं, २६ वेळा केले वार

Crime News: अमेरिकेत ७१ वर्षीय घरमालकाने ६ वर्षाच्या पॅलेस्टाईन मुलाची हत्या केल्याची घटना घडलीय.

Bharat Jadhav

America crime :

हमास- इस्राइलच्या युद्धामुळे इतर देशांमध्ये 'हेट क्राइम'च्या घटना घडत आहेत. अमेरिकेत देखील हेट क्राइमची घटना घडलीय. येथे एका ७१ वर्षीय घर मालकाने ६ वर्षाच्या पॅलेस्टाईन मुलाची हत्या केली. विल काउंटी शेरिफ कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलावर २६ वेळा चाकूने वार केलेत. याप्रकरणी घरमालकावर हेट क्राइमचा आरोप करण्यात आलाय. (Latest News)

जोसेफ जूबा असे या घरमालकाचे नाव आहे. दरम्यान घरमालकाच्या चाकू हल्ल्यात ३२ वर्षीय मुलाची आईदेखील जखमी झालीय. तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळालीय. दरम्यान अमेरिका राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी या घटनेचा निषेध केलाय. द्वेषाची ही भयानक घटना असल्याचं त्यांनी म्हटलंय.

हमास आणि इस्राइलच्या युद्धामुळे आणि ते मुस्लीम असल्यामुळे त्यांच्यावर हल्ला झाल्याचा जबाब नोंदवण्यात आलाय. शेरिफच्या कार्यालयाने पीडिता कुठेल्या आहेत, याची माहिती दिली नाहिये. दरम्यान हत्या झालेला मुलगा पॅलेस्टाईन अमेरिकन होता, अशी माहिती काउंसिल ऑन अमेरिकन रिलेशंसच्या शिकागो कार्यालयाने दिलीय. मृत मुलगा आणि त्याच्या आईवर हल्ला झाल्यानंतर मुलाच्या आईने पोलिसांना घटनेची माहिती दिली.

महिलेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या घर मालकाने त्यांना मारहाण केली. मुलगा आणि त्याच्या आईच्या छातीवर चाकूच्या हल्ल्याचे निशाण आहेत. मुलाचं पोस्टमोर्टम केल्यानंतर त्याच्या पोटातून ७ इंच लांब मिलिट्री चाकू काढण्यात आला. दरम्यान पोलिसांना या हत्येची माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली.

त्यावेळी पोलिसांनी पाहिले की, आरोपी जुबा हा आपल्याल घराच्या अंगणात बसलेला होता. त्याच्या डोक्यावर जखम झाली होती. दरम्यान या घरमालकावर हत्या, हत्या करण्याचा प्रयत्न आणि हेट क्राइम या दोन प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अशोक खरातप्रकरणी आणखी दोन वरिष्ठ पोलीस अधिकारी गोत्यात सापडण्याची शक्यता

Homemade Hairmask For Long And Shiny Hair: उन्हाळ्यात केसांची होईल लाबंच लांब वाढ, घरीच बनवा कोरफड आणि दहीचा हेअरमास्क

Suraj Chavan : सूरज चव्हाण होणार बाबा? बायकोचा बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा फोटो आला समोर

Gratuity Rules: नोकरी सोडताय? थांबा, त्यापूर्वी ग्रॅच्युटीचे हे नियम तुम्हाला माहित असायलाच हवे

धड भाषणही देता येत नाही, कुटुंबाच्या पूर्वपुण्याईवर खासदार; काँग्रेसचा नाव न घेता पार्थ पवारांवर सणसणीत पलटवार

SCROLL FOR NEXT