Amazon Saam TV
देश विदेश

ट्विटर, मेटानंतर आता Amazon देणार १० हजार कर्मचाऱ्यांना नारळ

या आठवड्यापासूनच यासंदर्भातील प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता

वृत्तसंस्था

Amazon Lay Off: ‘ट्विटर’, ‘मेटा’नंतर आता अ‍ॅमेझॉन देखील हजारो कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या तयारीत आहे. अ‍ॅमेझॉनच्या (Amazon) इतिहासातील ही सर्वात मोठी नौकारकपात असेल. कॉर्पोरेट आणि टेक्नॉलॉजी या विभागातील कर्मचाऱ्यांची कपात होण्याची शक्यता आहे. या आठवड्यापासूनच यासंदर्भातील प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात यात आहे. जगभरात अ‍ॅमेझॉनचे १६ लाखांहून अधिक कर्मचारी आहेत. नोकरकपात झाल्यास हा आकडा एकूण कर्मचारीसंख्येच्या १ टक्क्यापेक्षा कमी आहे.

कर्मचारी कपात झाल्यास यामध्ये डिव्हाइस ग्रुपसह रिटेल आणि एचआर विभागाचा समावेश आहे. यामध्ये अ‍ॅलेक्सा वॉइस असिस्टंटची जबाबदारी असणाऱ्या कर्चमाऱ्यांचाही समावेश असू शकतो. अ‍ॅमेझॉनने कर्मचाऱ्यांना दुसरी नोकरी शोधण्यास सांगितलं आहे.

सुट्टीच्या काळात कंपनीचे नुकसान

अ‍ॅमेझॉन सुट्टीच्या काळात सर्वाधिक विक्री करते. मात्र एरव्ही नफा होणाऱ्या सणांमध्येही तोटा झाल्यानंतर काही आठवड्यातच हा निर्णय घेण्यात आला आहे. किंमती वाढत असल्याने ग्राहक आणि व्यावसिकांकडे खर्चाकरता जास्त पैसै नसल्यानेच कंपनीला हा तोटा सहन करव लागत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे.

कपातीच्या घोषणेनंतर कंपनीच्या शेअरमध्येही घट झाली आहे. कंपनीचा सुमारे 40 टक्के स्टॉक कमी झाला आहे. कंपनीचा शेअर 2.4 टक्क्यांनी खाली $98.38 वर व्यापार करत होता. संभाव्य आर्थिक मंदीच्या काळात नौकारकपातीची घोषणा करणारी Amazon ही पहिली कंपनी नाही. यापूर्वी ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर इलॉन मस्कने कंपनीच्या कर्मचार्‍यांमध्ये 50 टक्के कपात केली होती. त्याचवेळी फेसबुकची मूळ कंपनी मेटानेही 11 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ नगरसेवकांवर कारवाई; ३ वर्षांसाठी अपात्र, कारण काय?

Maharashtra News Live Update: अमृत 2.0 योजनेअंतर्गत उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या स्वतंत्र पाणी योजनेला मंजुरी

Crime : बलात्कारपीडित १३ वर्षीय मुलीला न्याय हवा होता, ज्याच्याकडे मदत मागितली त्या वकिलानेही केले अत्याचार

Jana Nayagan: विजय थलापतींच्या 'जन नायकन'च्या रिलीजची तारीख ठरली; नवीन पोस्टर प्रदर्शित करत केली मोठी घोषणा

Bhandardara Tourism : छत्रीसारखा दिसणारा महाराष्ट्रातील 'हा' अनोखा धबधबा पाहिला का?

SCROLL FOR NEXT