Almora Bus Accident Almora Bus Accident
देश विदेश

Almoda Accident : उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना, बस दरीत कोसळली, २५ जणांचा मृत्यू

Almora Bus Accident: उत्तराखंडमधील अल्मोडा येथे मोठी दुर्घटना घडली आहे. बस दरीत कोसळल्यामुळे अनेकांचा जीव गेलाय.

Namdeo Kumbhar

Almora Bus Accident: उत्तरखंडमधील अल्मोड येथे मोठी दुर्घटना घडली आहे. ३५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली आहे. या अपघातामध्ये २५ जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथकं आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सध्या बचावकार्य वेगाने सुरु आहे.

अल्मोडामध्ये मार्चुला जवळ दरीमध्ये प्रवासी बस कोसळली. या अपघातामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याचं समजतेय. या बसमध्ये ३५ जण प्रवास करत होते. घटनास्थळावर सध्या बचावकार्य वेगात सुरु आहे. एनडीआरएफचे पथकही घटनास्थळी दाखल झालेय.

मिळालेल्या माहितीनुसार, नैनी डांडा येथून बस रामनगरकडे जात होती. चालकाला अंदाज न आल्यामुळे सकाळी बस दरीत कोसळली. गीत जागीर नदीच्या किनाऱ्याला बस दरीत कोसळल्यामुळे अनेकजणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आलेय. ५ जणांच्या मृत्यूची अधिकृत माहिती समोर आलेली आहे. या अपघातामध्ये काहीजण जखमीही झाले आहेत.

४२ आसनी बसमध्ये ३५ पेक्षा अधिक प्रवासी होते. बस दरीत कोसळल्याची घटना सकाळी घडली. या अपघातानंतर काही प्रवासी स्वतः बसमधून बाहेर आले. काही लोक बिथरून खाली पडले. या अपघातमध्ये जखमी झालेल्या प्रवाशांनी या दुर्घटनेची माहिती दिली. सध्या घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

Dhokla Recipe: सकाळी नाश्त्यासाठी बनवा स्पाँजी आणि चविष्ट ढोकळा चटणी, वाचा सोपी रेसिपी

आरसीबीच्या विजयानंतर मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर; पॉइंट टेबलमध्येही मोठा उलटफेर

Monday Horoscope: पैशाच्या समस्या कमी होतील, ५ राशींसाठी भरभराटीचा दिवस; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT