Viral video from Bihar sparks controversy after allegations of AK-47 use on student protesters. saam tv
देश विदेश

आंदोलक विद्यार्थ्यांवर AK-47नं गोळीबार, राहुल गांधी यांचा खळबळजनक दावा

From Pellet Guns in Delhi to AK-47 in Bihar: दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी पॅलेट गनचा वापर केल्याचा वाद ताजा असताना बिहारमध्ये AK-47नं गोळीबार केल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आलाय. या घटनेचा व्हिडिओच व्हायरल झालाय? काय आहे या व्हिडिओमध्ये ? कुणी केलाय हा आरोप? पाहूयात हा विशेष रिपोर्ट....

Suprim Maskar

'विद्यार्थ्यांवर AK-47नं गोळीबार'

संपूर्ण यंत्रणा ही विद्यार्थ्यांसाठी जीवघेणी आहे. बिहारमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांवर AK-47नं गोळीबार केल्याची बातमी समोर येत आहे आणि शेकडो विद्यार्थ्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. मोदीजी, विद्यार्थ्यांवर कोणतीही FIR दाखल केली जाणार नाही आणि त्यांना सोडून दिले जाईल, तुमचे हे आश्वासन कुठे गेले? दिल्लीत विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवली गेली आणि बिहारमध्ये AK-47. उत्तर प्रदेश असो, पश्चिम बंगाल, बिहार असो किंवा दिल्ली, प्रत्येक ठिकाणी पद्धत एकच आहे. मोदीजी, देशातील विद्यार्थ्यांची माफी मागा. आणि ज्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला आहे, ज्यांनी त्यांना तुडवले आहे, त्यांच्यावर कारवाई करा, विद्यार्थ्यांवर नाही.

त्यामुळे विद्यार्थी दहशतवादी आहेत का त्यांच्यावर AK-47नं गोळीबार करायला असा संतप्त सवाल काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधींनी उपस्थित केलाय... त्यालाच आता भाजप खासदार संबित पात्रा यांनी प्रत्युत्तर देत राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केलाय..

आधीच दिल्लीतील आंदोलकांवर पॅलेट गनने गोळ्या चालवल्या प्रकरणी अनेक जण जखमी झाल्याचं वास्तव समोर आलं होतं. विशेष म्हणजे CRPFनं केलेल्या चौकशी अहवालात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे... RAF जवानाने पॅलेट गननं सात गोळ्या चालवल्या...ज्यातील पाच गोळ्यांमुळे तीन आंदोलक जखमी झाल्याचं CRPFच्या अहवालात सांगण्यात आलयं....यावरून वाद सुरू असताना आता बिहारमध्ये AK-47 वापरल्याचे आरोप करण्यात आले. बिहारमध्ये 25 जुलैला पोलिसांनी विद्यार्थी आंदोलकांना फरफटत नेल्याचा तर कुठे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याच्या घटना घडल्या होत्या...मात्र काही पोलिसांनी थेट हातात AK- 47 सारखी शस्त्रच घेतल्याचा आरोप झाल्यानं वाद उफाळून आलाय..या प्रकरणी एका पोलिसाला निलंबित करण्यात आल्याचं समजतंय...विरोधकांना यावरूनच सरकारला घेरल्यामुळे सरकार काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कसारा घाटातील बोगद्यात बंद पडली वंदे भारत एक्स्प्रेस; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

52 कोटी भारतीयांच्या ताटातून पौष्टीक आहार गायब, संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड

FDAची थेट जिल्हाधिकारी कार्यालयातील कॅन्टीनवर धडक कारवाई; एक्सपायर अन्नपदार्थ आढळल्यानं परवाना रद्द

देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार? मोदींच्या मनात फडणवीसच शिक्षणमंत्री

पेपरफुटीनंतर GenZच्या निशाण्यावर इथेनॉल, CJPच्या धर्तीवर E-20 जनता पार्टी

SCROLL FOR NEXT