Nepal Plane Missing Saam Tv
देश विदेश

नेपाळमध्ये २२ प्रवाशांसह विमान बेपत्ता; ४ भारतीयांचा समावेश, शोध मोहिम सुरु

नेपाळच्या तारा एअर एअरलाइनचे विमान बेपत्ता झाले आहे. या विमानात एकूण २२ प्रवासी आहेत.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली : नेपाळची खासगी विमान कंपनी तारा एअरचे विमान (Plane) रविवारी बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. या विमानाचा वाहतूक नियंत्रणाशी संपर्क तुटला आहे. तारा एअरच्या या छोट्या प्रवासी विमानात एकूण २२ प्रवासी असल्याची माहिती आहे, त्यापैकी चार भारतीय असल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, दोन इंजिन असलेले तारा एअर 9 NAET हे विमान पोखराहून जोमसोमला जात असताना वाटेत नियंत्रण कक्षाशी त्याचा संपर्क तुटला. (Nepal Plane Missing)

या विमानात (Plane) एकूण २२ प्रवासी होते, त्यात चार भारतीय, तीन जपानी आणि बाकीचे नेपाळी नागरिक होते. विमानात तीन क्रू मेंबर्स होते. राजधानी काठमांडूपासून ८० किमी उत्तर-पश्चिमेस असलेल्या स्थानिक वेळेनुसार सकाळी ९.५५ वाजता विमानाने पर्यटन केंद्र पोखरा येथून जोमसोमकडे उड्डाण केले होते, पण मुस्तांगच्या टेकआउट भागात पोहोचल्यानंतर विमानचा संपर्क तुटला.

हे विमान मुस्तांग जिल्ह्यातील जोमसोम येथे आकाशात दिसले, त्यानंतर ते धौलागिरीच्या पर्वतांकडे वळले आणि तेव्हापासून याबद्दल काहीही माहिती नाही, अशी माहिती मुख्य जिल्हा अधिकारी नेत्रा प्रसाद शर्मा यांनी दिली. बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी गृह मंत्रालयाने तातडीने दोन खासगी हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. शोध मोहिमेसाठी नेपाळ लष्कराचे हेलिकॉप्टरही तैनात करण्यात आले आहे.

हेलिकॉप्टरने परिसरात शोधमोहीम राबविली जात आहे. नेपाळी लष्कराचे प्रवक्ते नारायण सिलवाल यांनी सांगितले की, नेपाळी लष्कराचे एमआय-१७ हेलिकॉप्टर घेऊन ते मुस्तांगला रवाना झाले असून, हे विमान येथेच कोसळले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : JEE परीक्षा केंद्रावर गोंधळ; विद्यार्थिनीला उशिरा आल्याने प्रवेश नाकारला, २ वर्षांची मेहनत मातीमोल

शनिवार ठरला घातवार, नाशिकनंतर धुळ्यात भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

Maharashtra Live News Update : अमरावतीच्या मेळघाटात मुसळधार पावसासह जोरदार गारपीट

IPL अर्ध्यावर सोडून कर्णधार अचानक मायदेशी परतला, सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा झटका

Gold Earrings Designs: डेली वेअरसाठी सोन्याच्या कानातल्यांचे 5 लेटेस्ट डिझाईन्स, प्रत्येक महिलेला शोभून दिसतील

SCROLL FOR NEXT