Air India Aircraft Saam TV
देश विदेश

Air India Aircraft: एअर इंडियाचं विमान पाकिस्तानच्या हद्दीत शिरलं...; पुढे काय घडलं?

Air India Aircraft: नंतर विमानाने लगेचच युटर्न घेतला आणि मोठा अनर्थ होतहोता टळला.

साम टिव्ही ब्युरो

Pakistan Airspace:

लंडनला जात असलेल्या एअर इंडियाच्या विमानाबाबत एक मोठी घटना घडली आहे. दिल्लीहून निघालेलं हे विमान काही वेळ उडता उडता भरकटले आणि पाकिस्तानच्या हवाई हद्दीत शिरले, नंतर विमानाने लगेचच युटर्न घेतला आणि मोठा अनर्थ होतहोता टळला. (Latest Marathi News)

विमानाने माघार घेतल्यावर पुन्हा दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरवण्यात आलं. विमान दिल्लीला लँड झाल्याने सर्व प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. तांत्रिक बिघाड झाल्याने विमान उतरवले असल्याचे समजताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली.

गुरुवारी सकाळी ७.१५ वाजता इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बोईंग 787-8 ड्रीमलाइनर फ्लाइट क्रमांक AI0111 या विमानाने उड्डाण घेतली. उड्डाण घेतल्यावर पाकिस्तानी हवाई हद्दीत प्रवेश केल्याने दिल्लीत तातडीने यूटर्न घेत लँडींग केलं आहे. ३६ हजार फूट उंचावरून या विमानाने यूटर्न घेतला.

या विमानातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने आपल्या x ट्वीटर अकाऊंटवर याबाबत माहिती दिली आहे. एअर इंडियाच्या खराब सेवेमुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे. विमानात तांत्रिक बिघाड आणि एसीच्या समस्येला सामोरे जावे लागले. यावेळी वैमानिक हवेत प्रयोग करत होता,असे आरोप प्रवाशाने ट्वीटकरत केलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT