Air India Plane Fire In Delhi Airport 
देश विदेश

Air India Plane Fire: दिल्ली एअरपोर्टवर मोठा अपघात; लँडिंगवेळी एअर इंडियाच्या विमानाला आग

Air India Plane Fire In Delhi Airport: दिल्ली विमानतळावर एक मोठा अपघात घडलाय. एअर इंडियाच्या एका विमानाला भीषण लागल्याची घटना घडलीय.

Bharat Jadhav

दिल्ली विमानतळावर एक मोठा अपघात घडलाय. गेल्या काही दिवसांपासून एअर इंडियाच्या विमानांचे काही काही अपघात होताना दिसत आहेत. आज पुन्हा एकदा एअर इंडियाच्या विमानाला आग लागल्याची घटना घडलीय. लँडिंग होताच एअर इंडियाच्या विमानाला आग लागली. विमानतळ प्राधिकरणाने जारी केलेल्या निवेदनानुसार, एअर इंडियाचं विमान हाँगकाँगहून दिल्ली आले होते.

दिल्ली विमानतळावर उतरताच एअर इंडियाच्या विमानाच्या सहाय्यक पॉवर युनिटला आग लागली. सुदैवाने यात कोणत्याच प्रकारची जीवितहानी झाली नाहीये. या अपघातात सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.

विमानतळ प्राधिकरणाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोमवारी दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर उतरल्यानंतर एअर इंडियाच्या विमानाला आग लागली. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, घटनेनंतर प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षितपणे उतरले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai To Jalgaon Travel: मुंबईहून जळगावपर्यंतचा प्रवास कसा कराल? रेल्वे, बस आणि कार कोणता पर्याय आहे बेस्ट?

Lokmanya Tilak Award: PM मोदींनंतर नितीन गडकरींचाही पुण्यात सन्मान, लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर

Maharashtra Live News Update: लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रदान

Prajakta Mali : प्राजक्तासोबत फोटो काढण्यासाठी चाहत्याची धडपड; थेट लिफ्टच्या दारात उभा राहीला, पाहा VIDEO

Tmkoc: बाबो! इतक्या वर्षाची झाली 'तारक मेहता' फेम दया भाभी; खरं रूप पाहून आश्चर्य वाटेल

SCROLL FOR NEXT