Afghanistan: शिया मशिदीत बॉम्बस्फोट झाल्याने हाहाकार, ३० जण मृत्युमुखी Saam Tv
देश विदेश

Afghanistan: शिया मशिदीत बॉम्बस्फोट झाल्याने हाहाकार, ३० जण मृत्युमुखी

कंदहार मधील शिया मशिदीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये आज जवळपास ३० जण ठार झाले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : कंदहार मधील शिया मशिदीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये आज जवळपास ३० जण ठार झाले आहेत. तर जवळपास २० जण जखमी झाले आहेत, असे स्थानिक रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले आहे. अफगाण नागरिकांना आणि विशेषत: शियांना कोणती सुरक्षा देण्यात तालिबान स्पष्टपणे अपयशी ठरलेला आहे.

अफगाणिस्तान मधील कुंदूझ या ठिकाणी शियापंथीयांच्या मशिदीमध्ये मागील आठवड्यात घडविण्यात आलेल्या बाॅम्बस्फोटामध्ये सुमारे १०० जण ठार किंवा जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटाची जबाबदारी अद्याप कोणी देखील स्वीकारली नाही. या अगोदर इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तानमध्ये अशाप्रकारचे हल्ले, बॉम्बस्फोट घडवून आणले आहेत.

हे देखील पहा-

मात्र, त्या संघटनेने शुक्रवारच्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही. कुंदूझ या ठिकाणी शुक्रवारी मशिदीत नमाज पठणाकरिता भाविक जमले असताना हा बॉम्बस्फोट घडवून आणला आहे. अफगाणिस्तान मध्ये शियापंथीय अल्पसंख्याक आहेत. तालिबानींनी त्या देशावर कब्जा केल्यावर त्याठिकाणची स्थिती अधिकच बिकट झाली आहे. त्यामध्ये आता नागरिकांवरच हल्ले होत असल्याने परिस्थिती आणखी चिघळत जाण्याची शक्यता आहे.

कुंदूज प्रांताचे पोलीस उपप्रमुख दोस्त मोहम्मद ओबैदा यांनी दिलेल्या माहितीनुसार की, मशिदीमध्ये असलेल्या भाविकांपैकी बहुसंख्य भाविक या बॉम्बस्फोटात ठार झाले आहेत. आत्मघाती हल्लेखोरामार्फत हा बॉम्बस्फोट घडवून आणला आहे. सर्वांच्या रक्षणाकरिता तालिबान सरकार योग्य उपाययोजना करणार असल्याची माहिती देण्यात आली होती.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Noida Building Fire: ५ मजली इमारतीला भीषण आग, २ जणांचा मृत्यू; स्कूटी चार्ज करताना झालेल्या ब्लास्टमुळे घडली दुर्घटना

मोठी बातमी! माजी खासदार विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता, मोठी अपडेट समोर

Maharashtra News Live Update: संत सोपान काकांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा आज पार पडला

इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरून तुफान चर्चा; नितीन गडकरींची बदनामी केल्याप्रकरणी ४ प्रसिद्ध एन्फ्ल्यूएन्सर कोण? कोणावर गुन्हा दाखल

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर ₹१५०० जमा, जूनच्या हप्त्याचे पैसे तुम्हाला आले का? लगेच अकाऊंट तपासा

SCROLL FOR NEXT