Saam breking Saam Tv
देश विदेश

Kabul Mosque Blast : काबुलमधील मशिदीत बॉम्बस्फोट; २१ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

अफगाणिस्तान पुन्हा एकदा स्फोटाने हादरलं आहे.

Satish Daud

Kabul Mosque Blast : अफगाणिस्तान पुन्हा एकदा स्फोटाने हादरलं आहे. काबुल येथील एका मशिदीत बुधवारी बॉम्बस्फोट झाला. यामध्ये २१ जणांचा मृत्यू झाला तर ६० हून अधिकजण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांपैकी २७ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. यामध्ये ५ लहान मुलांचा देखील समावेश आहे.

प्राप्त माहितीनुसार, सर-ए-कोटल खैरखाना येथे हा स्फोट झाला आहे. काबूलच्या सुरक्षा विभाग खालिद जरदान यांनी स्फोटाला दुजोरा दिला आहे. सध्या सुरक्षा दल स्फोटाच्या ठिकाणी पोहोचले आहे. या बॉम्बस्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेनं घेतली नाही.

गुरूवारी काबूलच्या मशिदीत बॉम्बस्फोट झाला. या घटनेत तब्बल २१ जणांचा मृत्यू झाला तर ६० हून अधिकजण जखमी झालेत. जेव्हा हा स्फोट झाला त्यावेळी मशिदीत काही लोक नमाज पठण करत होते.

अचानक बॉम्बस्फोट झाल्यानंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण झालं.अनेक लोक सैरावैरा पळू लागले. त्यामुळे अनेकजण जखमी झाले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जातेय.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight loss plan: 1 महिन्यात कमी करा 5 ते 7 किलो वजन कमी; तज्ज्ञांनी सांगितला सोपा डाएट आणि फिटनेस प्लॅन

Sex Racket Bust : स्पा सेंटरच्या आडून सुरु होती देह विक्री, ६ महिला आणि २ पुरुष नको त्या अवस्थेत; पोलिसांनी दार उघडलं अन्...

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित रिंगरोडच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध कायम

51 कर्मचारी-अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई! प्रशासकीय वर्तुळात खळबळ; महापालिकेत नेमकं काय घडलं?

गावरान स्टाईल कवळा भाजी बनवण्याची सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT