Passenger bus collides with truck and motorcycle 
देश विदेश

Watch VIdeo : प्रवासी बस ट्रकला धडकली अन् पेटली, ७१ जणांचा मृत्यू, १७ चिमुकल्यांचाही समावेश

Passenger bus collides with truck and motorcycle :अफगाणिस्तानच्या पश्चिम हेरात प्रांतात बस अपघात झाला. या दुर्घटनेत तब्बल ७१ जणांचा मृत्यू झाला असून त्यात १७ लहान मुलांचा समावेश आहे. मृतांमध्ये इराणमधून परतणारे अफगाण स्थलांतरितही होते.

Namdeo Kumbhar

  • अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात प्रवासी बस ट्रक आणि दुचाकीला धडकली.

  • धडक झाल्यानंतर बस पेटली आणि ७१ जणांचा मृत्यू झाला.

  • मृतांमध्ये १७ लहान मुलांचा आणि अनेक स्थलांतरितांचा समावेश आहे.

  • ही दुर्घटना अफगाणिस्तानमधील गेल्या काही वर्षांतील सर्वात मोठी मानली जात आहे.

Afghanistan Herat bus accident kills 71 passengers including 17 children : अफगाणिस्तानमध्ये प्रवासी बसचा महाभयंकर अपघात झाला, यामध्ये ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये १७ लहान मुलांचा समावेश आहे. स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, प्रवासी बसची ट्रक आणि दुचाकीला जोरात धडक बसली. त्यानंतर प्रवासी बसने अचानक पेट घेतला. त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. या दुर्दैवी घटनेत ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानमधील गेल्या काही वर्षांमधील ही सर्वात मोठी दुर्घटना मानली जातेय. (AFGHANISTAN BUS ACCIDENT IN HERAT: 71 DEAD INCLUDING 17 CHILDREN)

अफगाणिस्तानच्या पश्चिम हेरात प्रांतात ही दुर्दैवी घटना घडली. प्रांतीय सरकारचे प्रवक्ते अहमदुल्लाह मुत्ताकी यांनी X वर पोस्ट करत या दुर्दैवी घटनेबाबत माहित दिली. मुत्ताकी यांनी या दुर्घेटनेतील मृतांचा आकडा जाहीर केला. ते म्हणाले, “हा अपघात इतका भयानक होता की, यात 71 जणांचा मृत्यू झाला.” मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये इराणमधून परतलेले अफगाण स्थलांतरित होते, असे प्रांतीय अधिकारी मोहम्मद युसूफ सईदी यांनी AFP ला सांगितले. हे सर्व प्रवासी इस्लाम काला या इराणच्या सीमेवरील प्रमुख क्रॉसिंग पॉइंटवरून बसने काबूलकडे निघाले होते.

या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. पण अरुंद रस्ते, खराब वाहनांची स्थिती आणि बेफिकीर वाहनचालक अपघात झाल्याचे बोलले जातेय. स्थानिक प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली आहे. या दुर्घटनेतील जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हेरातमधील स्थानिक समुदायाने या दुर्घटनेमुळे शोक व्यक्त केला आहे, तर सरकारने मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shweta Tiwari: ४४ वर्षाच्या श्वेता तिवारीचा ग्लॅमरस लुक, फोटो पाहून चाहते फिदा

Maharashtra Rain Live News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाण पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

Navi Mumbai : गटाराच्या पाण्यात महिलेने धुतली भाजी, नवी मुंबईतील प्रकार; किळसवाणा Video Viral

Ayushman Bharat Scheme: उपचार करायचाय? पण आयुष्मान कार्ड हरवलंय, तर कसा होणार मोफत उपचार? काय आहे नियम

Heavy Rain : मुसळधार पावसाचा हाहाकार; कल्याण- डोंबिवलीतील सखल भागात पाणी, जनजीवन विस्कळीत PHOTO

SCROLL FOR NEXT