CCTV Footage of Saloon Saam TV
देश विदेश

Viral Video News: मृत्यूने सलूनमध्ये गाठलं! भरधाव कार दुकानात शिरली अन् २ सेकंदात होत्याचं नव्हतं झालं

Car Entered In Saloon: एक मोठी कार सुसाट वेगाने सलूनमध्ये शिरते आणि बेंचवर बसलेली व्यक्तीला धडकते.

प्रविण वाकचौरे

CCTV Video : मृत्यू कुणाला कुठे गाठेल याचा काही नेम नाही. धावपळीच्या जगात तर अनेक अपघात होतात, ज्यात अनेकांना आपले जीव गमावावे लागतात. मात्र अनेकदा काहीही चूक नसताना काहींना जीव गमवावा लागतो. असाच एक अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये जे दिसतंय त्यानुसार, एक व्यक्ती सलूनमध्ये बसून आपल्या नंबरची वाट पाहत आहे. दरम्यान सलूनचा मालक एका ग्राहकाचे केस कापत आहे. पण अचानक एक वेगवान कार सलूनमध्ये शिरते आणि काही सेकंदात लोकांना उडवून देते. (Latest news)

व्हिडिओ पाहून तुम्हाला अंदाज येईल पुढे काय झाले असेल. ही संपूर्ण घटना सलूनमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

कार दुकानाकडे येत असताना लोक पाहत होते. त्यानंतर काही ग्राहक पटकन उठतात आणि कोपऱ्यात सरकतात. मात्र बेंचवर बसलेल्या ग्राहकाला हालचाल करण्यासाठी देखील वेळ मिळत नाही. तेवढ्यात कार सुसाट वेगाने सलूनमध्ये शिरते आणि बेंचवर बसलेली व्यक्तीला धडकते. हा व्हिडिओ @ViciousVideosने ट्विटरवर शेअर केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : बौद्धभूमी फाउंडेशन प्रकरणात मोठी अपडेट; श्रीकांत शिंदेंनी KDMC आणि MMRDA ला दिले सखोल चौकशीचे आदेश

कर्जमाफीच्या अटी, शेतकऱ्यांसाठी कटकटी; केवळ 17 लाख शेतकऱ्यांनाच संपूर्ण कर्जमाफी?

'मोदींचे सरकार जाणार, आणीबाणी येणार'; राहुल गांधींचा खळबळजनक दावा

Fact Check: शाहरूख खान कॉकरोच जनता पार्टीत जाणार? लवकरच पार्टी जॉईन करण्याची घोषणा?

फुले दिले की फुलेच मिळतात, कुणी टीका केली, तरी शांत राहायचं; जॅकी श्रॉफ असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT