Accident News  Saam TV
देश विदेश

UP Accident News : वऱ्हाड्यांची कार कालव्यात कोसळली; तिघांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता

Accident News : उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील जहांगीरपूर पोलीस स्टेशन परिसरात हा अपघात झाला आहे. कारमधील तीन जण अद्याप बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू आहे.

प्रविण वाकचौरे

UP Accident News :

लग्न समारंभासाठी निघालेली वऱ्हाड्यांची कार कालव्यात पडून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील जहांगीरपूर पोलीस स्टेशन परिसरात हा अपघात झाला आहे. कारमधील तीन जण अद्याप बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांनी या अपघाताची दखल घेतली असून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कारमध्ये एकूण 8 लोक प्रवास करत होते. ते बुलंदशहरच्या शेरपूर गावातून अलीगढ पिसावा लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी जात होते.

दरम्यान, त्यांची कार नियंत्रणाबाहेर जाऊन कपना कालव्यात उलटली, त्यामुळे हा अपघात झाला. आतापर्यंत ३ जणांचे मृतदेह सापडले असून उर्वरित ३ जणांचा शोध सुरू आहे. एसडीआरएफ आणि इतर पथके शोधकार्य करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT