आरोग्य अधिकाऱ्याकडून सहकारी महिलेवर बलात्कार; जबरदस्ती करायचा अश्लील चाळे  SaamTv news
देश विदेश

आरोग्य अधिकाऱ्याकडून सहकारी महिलेवर बलात्कार; जबरदस्ती करायचा अश्लील चाळे

सरकारी आरोग्य अधिकाऱ्याने कार्यालयामध्ये सोबत काम करणाऱ्या महिलेबरोबर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : सरकारी आरोग्य अधिकाऱ्याने कार्यालयामध्ये सोबत काम करणाऱ्या महिलेबरोबर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आपल्या अधिकाराचा गैरवापर करत आरोपी मागील बऱ्याच दिवसांपासून पीडित महिलेबरोबर अश्लील कृत्य करत होता. पण कार्यालयातील आरोपीचे पद लक्षात घेऊन कोणी देखील त्याचा विरोध करत नव्हते.

अखेर एका समाजिक कार्यकर्त्या महिलेला ऑफिसमध्ये सुरू असलेला प्रकार लक्षात येताच, त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल (FIR) केली आहे. शनिवारी पोलिसांनी आरोपीला अटक (arrested) करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस करत आहेत. संबंधित घटना कर्नाटक राज्यामधील मंगळुरू येथील असून अटक केलेल्या आरोग्य अधिकाऱ्याचे नाव रत्नाकर असे आहे. आरोपी रत्नाकर हा कुष्ठरोग निर्मूलन शाखेत नोडल अधिकारी म्हणून कार्यरत आहे.

हे देखील पहा-

या प्रकरणी मंगळुरू महिला पोलीस ठाण्यात याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रत्नाकर याचे कार्यालयामध्ये काम करणाऱ्या महिलेबरोबर अश्लील चाळे करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या व्हायरल होतं आहेत. संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी नराधम आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी अधिकाऱ्याच्या काळ्या कृत्यांना सहकार्य न केल्यास आरोपीकडून ऑफिसमधील महिलांना मुद्दाम टार्गेट केले जात असल्याचा आरोप एका सहकारी महिलेने केला आहे.

तसेच आरोपी पीडित महिलेला जबरदस्ती फिरायला घेऊन गेला होता. फिरायला गेल्यावर त्याच्याबरोबर फोटो काढताना 'पोज' देण्याकरिता दबाव टाकल्याचे देखील सहकारी महिलेने सांगितले आहे. महिला पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी पीडित महिलेशी संपर्क साधला आहे. तिने कायदेशीर कारवाईत सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पण सुरक्षिततेचा धोका लक्षात घेऊन आपण आरोपी विरोधामध्ये फिर्याद दाखल करणार नाही, असे निर्णय पीडित महिलेने घेतला आहे. कार्यालयामध्ये सहकारी महिलेबरोबर गैरवर्तन केल्यामुळे आरोपी आरोग्य अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sahyadri Express Loot: सिग्नलमध्ये बिघाड करुन सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा; प्रवाशांचे मोबाईल, सोने लुटले

Sanju Samson Century: संजू सॅमसनचा जबरा तडाखा, फक्त ५२ चेंडूंत ठोकलं शतक; अनेक रेकॉर्ड उद्ध्वस्त, CSK चा धावांचा डोंगर

मोदी सरकारचा मोठा धक्का! डिझेलवरील निर्यात शुल्क वाढवला

Accident News: बस आणि पिकअपची समोरासमोर जोरदार धडक; भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू,२५ जखमी

पाकची गुलामगिरी, मध्यस्थीची शिष्टाई, बिघडलेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT