Abhijeet Dipke saam tv
देश विदेश

Abhijeet Dipke : अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा; जंतर-मंतर 'सीझन २' लवकरच, अमित शहांवरही गंभीर आरोप

Abhijeet Dipke announces Jantar Mantar Season 2 : जंतरमंतरवरील यशस्वी आंदोलनानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी मोठी घोषणा केलीय. यावेळी अमित शहांवरही गंभीर आरोप केला आहे.

Nandkumar Joshi

जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी संसदेत चर्चा करावी. शाहा हे संसदेतून पळ काढत आहेत, असा गंभीर आरोप कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केला आहे. दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर आंदोलनाचा 'सीझन २' लवकरच सुरू होईल, अशी मोठी आणि महत्वाची घोषणा देखील दिपकेंनी केली. इन्स्टाग्रामवरील चाहत्यांच्या आणि समर्थकांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळं धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंनी मोठी घोषणा केली. जंतरमंतरचा सीझन-२ लवकरच येणार आहे, असे दिपके म्हणाले. अनेक जण इन्स्टाग्रामवर कमेंट करत होते की जंतरमंतरचा सीझन २ कधी येणार आहे. पण सीझन २ लवकरच येईल, असं त्यांना मी या माध्यमातून सांगतो, असं दिपके म्हणाले.

नीट पेपरफुटीनंतर दिल्लीतील जंतरमंतर मैदानासह देशातील विविध भागांत विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. जंतरमंतरवरील आंदोलनात सीजेपीच्या अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांसह पालकही सहभागी झाले होते. संसदेवरही मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. त्यानंतर आंदोलक अधिक आक्रमक झाले. आंदोलनाची धार वाढली. अखेर धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

झारखंड विद्यार्थी आंदोलनावर काय म्हणाले दीपके?

तत्पूर्वी, अभिजित दीपके यांनी मंगळवारी झारखंडमधील आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या घटनेचा निषेध केला. विद्यार्थी आपल्या हक्कांसाठी लढत आहेत, व्होट बँकेसाठी नाही. केवळ आंदोलन करणारे विद्यार्थी आणि तरुणच पोलिसांच्या कारवाईला का सामोरे जातात? राजकीय पक्षांचे कार्यकर्ते का नाहीत? असा सवाल त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

SCROLL FOR NEXT