Aaryan Khan : ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानची वैद्यकीय तपासणी! SaamTvNews
देश विदेश

Aaryan Khan : ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानची वैद्यकीय तपासणी!

आर्यन खानला मुंबईतील जेजे रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी हजर करण्यात आले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ जहाजावर चाललेल्या ड्रग्ज पार्टीवर NCB विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासह अधिकाऱ्यांनी काल रात्री केलेल्या छापेमारीत बॉलिवूडचा किंगखान शाहरुखचा मुलगा आर्यन खानचा देखील समावेश असल्याचे समोर आले होते. आर्यनला NCB कडून ताब्यात घेऊन त्याला मुंबईतील जेजे रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी हजर करण्यात आले आहे.

हे देखील पहा :

क्रूझवर चाललेल्या या ड्रग पार्टीत चरस, कोकेन आणि एमजी ड्रग्ज सारख्या अमली पदार्थाचे सेवन आर्यनसह इतर तरुण-तरुणींनी केल्याचे समोर आले आहे. एनसीबीने मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ जहाजावर चालणाऱ्या ड्रग पार्टीवर छापा टाकला आणि दहा जणांना ताब्यात घेतले. एक वरिष्ठ पोलिस अधिकारीही या जहाजावर पार्टीत सहभागी होण्यासाठी आला होता.

क्रूझवर आठ तासांहून अधिक काळ हा छापा सुरू होता. ही क्रूझ मुंबई सोडून समुद्रात पोहोचताच ड्रग्ज पार्टी सुरु झाली. मात्र, या ड्रग्ज पार्टीची कुणकुण या पूर्वी NCB ला लागल्याने NCBच्या टिमने क्रूझवर सापळा रचला होता. पार्टीत ड्रग्ज सेवन केलं जात असल्याचं लक्षात आल्यानंतर ही पार्टी थांबवून क्रूझ पून्हा मुंबई पोर्टवर घेण्यात आलं.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Detox Drinks: फॅटी लिव्हर कंट्रोल करण्यासाठी हे डिटॉक्स वॉटर ठरेल फायदेशीर

Maharashtra News Live Update: NCERT च्या विरोधात साताऱ्यात एल्गार, छत्रपती घराण्याच्या वतीने काढण्यात आला मोर्चा

Health Care: जेवणाआधी पाणी पिणे की जेवणानंतर? चांगल्या आरोग्यासाठी पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?

Kalyan Dombivli : कल्याण- डोंबिवलीत पाणीबाणी, १२ तास पाणीपुरवठा राहणार बंद; कोणकोणत्या भागांना फटका बसणार?

Bharat Taxi: ओला उबरला देणार टक्कर! 'भारत टॅक्सी' सेवा मुंबईत सुरु; किती भाडे द्यावे लागणार? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT