Arvind Kejriwal News Update saam tv
देश विदेश

Arvind Kejriwal News : अरविंद केजरीवाल यांना उद्या अटक होणार? 'आप'चं पुढचं प्लानिंग कसं असेल?

Political News : मात्र जर अरविंद केजरीवाल यांना अटक झाली तर आम आदमी पक्षाचं पुढचं प्लानिंग कसं असेल? याबाबत आपचे नेते सौरभ भारद्वाज यांना विचारलं.

प्रविण वाकचौरे

News Delhi News :

नवी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी २ नोव्हेंबर रोजी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलवले आहे. दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी केजरीवाल यांना समन्स पाठवण्यात आलं आहे. मात्र चौकशीनंतर अरविंद केजरीवाल यांना अटक केली जाईल, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

मात्र जर अरविंद केजरीवाल यांना अटक झाली तर आम आदमी पक्षाचं पुढचं प्लानिंग कसं असेल? याबाबत आपचे नेते सौरभ भारद्वाज यांना विचारलं.

यावर ते म्हणाले, सध्यातरी मला माहीत नाही. याबाबत काही चर्चा झाली असेल मला वाटत नाही. केजरीवाल आमचे नेते आहेत आणि आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू, असं सौरभ भारद्वाज यांनी म्हटलं.

सौरभ भारद्वाज यांनी NDTVला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, मनीष सिसोदिया यांना जामीन नाकारण्यात आला. त्यानंतर ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी समन्स पाठवले. आम आदमी पक्षाला राजकीय शिक्षा देण्याचा हा डाव आहे.'आप'पासून त्यांची राजकीय सुटका व्हावी यासाठी हे केले जात आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अरविंद केजरीवाल यांची चौकशी होईल याचा अंदाज होता. दोन दिवसांपूर्वी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत मनोज तिवारी यांनी अरविंद केजरीवालांचा पुढचा नंबर असल्याचं म्हणत त्यांना अटक केली जाईल असं म्हटलं होतं. मला आश्चर्य वाटते की केजरीवाल यांना बोलावले जाईल हे मनोज तिवारींना कसे कळले?यावरून मला खात्री पटली की ही एक राजकीय स्क्रिप्ट आहे, असं सौरभ भारद्वाज यांनी म्हटलं.

अरविंद केजरीवाल यांना चौकशीच्या निमित्ताने अटक करण्याची तयारी सुरू असल्याचे आम आदमी पक्षाचे नेते सांगत आहेत. यापूर्वी सोमवारी, सर्वोच्च न्यायालयाने 247 दिवस तुरुंगात असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना जामीन देण्यास नकार दिला. आप नेते मनीष सिसोदिया यांच्यावर दिल्ली दारू धोरणात भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. प्रदीर्घ चौकशीनंतर २६ फेब्रुवारीला त्यांना अटक करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mens Health After 40: फक्त पुरुषांनाच होतात हे ४ जीवघेणे आजार, चाळिशीतल्या पुरुषांनी आत्ताच व्हा सावध

LPG Cylinder Blast : सिलिंडरच्या भीषण स्फोटात तीन घरे उध्वस्त, दोन लहान मुलांचा होरपळून मृत्यू, ७ जण गंभीर जखमी

Summer Makeup Tips: मेकअपसाठी 3-1-1 हा नियम नक्की काय आहे? जाणून घ्या परफेक्ट मेकअपचं सिक्रेट

Chandrika Dixit Controversy: 'मुलासाठी कुणासोबत झोपावं लागलं तरी…'; बिग बॉस फेम इन्फ्लुएंसरचं धक्कादायक वक्तव्य

Dharashiv Accident: लातूर-तुळजापूर महामार्गावर विचित्र अपघात; 3 अलीशान कार एकमेकांना धडकल्या, 3 जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT