BJP Parvesh Verma Viral Video Saam TV
देश विदेश

Political Row : भाजप मंत्री ऑन कॅमेरा भडकला! थेट तरुणाच्या कानशिलात हाणली; Video प्रचंड व्हायरल

Parvesh Verma : दिल्लीचे मंत्री प्रवेश वर्मा यांचा तरुणाला चापट मारल्याचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचा दावा आहे. रस्त्यांच्या निकृष्ट कामावरून हा प्रकार घडल्याचा आरोप आपकडून करण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

BJP Parvesh Verma Viral Video : दिल्ली सरकारमधील भाजपचे मंत्री प्रवेश वर्मा यांचा एक धक्कादायक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मंत्री वर्मा एका तरुणाला कॅमेऱ्यासमोर कानाखाली मारताना त्या व्हिडीओत दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण दिल्लीतील रस्ते बांधकामात झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत आणि भ्रष्टाचाराबाबत प्रश्न विचारत होता आणि त्याचा व्हीडिओ बनवत होता. त्यामुळे वर्मा यांचा पारा चढला. वर्मा यांनी पोलिसांसमोर आणि कॅमेऱ्यासमोरच तरूणाच्या कानाखाली मारली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या घटनेचा व्हीडिओ समोर आल्यानंतर आपने भाजप आणि मंत्री प्रवेश वर्मा यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "दिल्लीतील रस्त्यांच्या दुरवस्थेची आणि भ्रष्टाचाराची पोलखोल केल्यामुळेच मंत्री महोदयांनी पोलिसांच्या मागे लपून तरुणावर हात उचलला आणि तेथून पळ काढला," असा गंभीर आरोप आपने केला आहे. भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावरही लोकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आपने भाजप मंत्र्यांच्या या कृत्यावर कडक कारवाईची मागणी केली आहे. दिल्ली सरकारकडून बनवण्यात आलेल्या रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाबाबत एक तरुण व्हिडिओ बनवत होता. हा तरुण रस्त्यावरील भ्रष्टाचाराची पोलखोल करत असताना मंत्री प्रवेश वर्मा यांनी चापट मारल्याचा आरोप आपने केला आहे.

भाजप सरकारचा मंत्री आहे की कोणी गुंड. दिल्ली सरकारमधील मंत्री प्रवेश वर्मा यांच्या रस्त्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल झाली, तर ते थेट तरुणाला भररस्त्यात कानाखाली मारून गुंडागर्दीवर उतरले.
आप

मंत्री प्रवेश वर्मा भित्रे आहेत. एका लहान मुलाला मारहाण करणे अत्यंत लाजीरवाणे आहे. पोलिसाच्या मागे लपून, आपला व्हिडिओ बनवणाऱ्या एका लहान मुलावर हल्ला करणे आणि नंतर गाडीत बसून पळून जाणे, हा त्यांचा भित्रेपणा दाखवून देतो. तो मुलगा दिल्ली सरकारने बनवलेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांची पोलखोल करणारा व्हिडिओ बनवत होता. आपली पोलीस सुरक्षा आणि रक्षक हटवून बघा, मग समजेल की तुम्ही खरंच किती धाडसी आहात. ताकद असेल तर कोणतीही पोलीस सुरक्षा न घेता या लहान मुलाचा सामना करून दाखवा, अशी संतप्त प्रतिक्रिया आपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनी दिली आहे. त्यांनी फेसबुकवर आपला संताप व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT