VIRAL VIDEO Saam TV
देश विदेश

VIRAL VIDEO:बहिणीचा फोन नंबर दिला म्हणून कपडे काढून तरुणाला पट्ट्याने मारहाण; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सत्यमचे कपडे काढून त्याला पट्ट्याने मारहाण केली आणि त्याचा व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला.

साम टिव्ही ब्युरो

VIRAL VIDEO : अजमगड येथून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यात एका तरुणाला दोन जण बेदम मारहाण करताना दिसत आहेत. त्या मुलाचे कपडे काढून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करताना केली आहे. सध्या पोलीस या घटनेत मारहाण करणाऱ्या मुलांचा शोध घेत आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना ही सोफीगड गावातील अहरौली पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर एसपी अनुराग आर्य यांच्या हाती लागला आणि त्यांनी आरोपी युवकांचा शोध सुरू केला आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.

स्थानिक माध्यमांवर आलेल्या माहितीनुसार, बहिणीचा (Sister) फोन नंबर दिला म्हणून युवकाला मारहाण करण्यात आली आहे. मारहाण केलेल्या मुलांची नावे मिंटू आणि करण अशी आहेत. हे दोघे एकमेकांचे मित्र आहेत. सत्यमने त्याच्या एका मित्राच्या बहिणीचा फोन नंबर दुसऱ्या एका मुलाला न सांगता दिला त्यामुळे मिंटू आणि करण या दोघांनी त्याला मारहाण केली.

हे दोघे जण त्याला एका अज्ञात ठिकाणी घेऊन आले. त्यानंतर त्यांनी त्याला लाथाबुक्यांनी मारहाण करायला सुरूवात केली. इतकेच नाहीतर सत्यमचे कपडे काढून त्याला पट्ट्याने मारहाण केली आणि त्याचा व्हिडिओ (Video) देखील रेकॉर्ड केला. मिंटू आणि करणने तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यामुळे व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून एसपी अनुराग आर्य यांनी आरोपी मुलांना लवकरात लवकर ताब्यात घेण्याचे निर्देश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्याच्या राजकारणात खळबळ; साताऱ्यात भाजपच्या माजी मंत्र्यांना अटक

Holi: नववधूनं लग्नानंतरची पहिली होळी सासरी का साजरी करू नये?

Vidhan parishad Leader: राज्यसभा निवडणुकीनंतर विधान परिषदेत विरोधी पक्षनेता निवडीचा लागणार निकाल?

Maharashtra Live News Update: ब्रम्हाकुमारीजच्या राज्यव्यापी मोहिमेचा प्रारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार

Crime News : दिराची वहिनीवर वाकडी नजर; मित्रांच्या मदतीने केला सामूहिक बलात्कार

SCROLL FOR NEXT