Viral News Saam TV
देश विदेश

Viral News: अबब! एकाच वेळी महिलेने ९ मुलांना दिला जन्म; मुलांमुळे आईचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

साम टिव्ही ब्युरो

Viral News: पूर्वीच्या काळी महिला ९ ते १० मुलांना जन्म द्यायच्या ही गोष्ट तुम्ही नक्की ऐकली असेल. मात्र एका महिलेने एकाच वेळी एवढ्या मुलांना जन्म दिलेलं तुम्ही ऐकलं आहे का? एका महिलेने एकाच वेळी तब्बल ९ मुलांना जन्म दिला आहे. विशेष बाब म्हणजे यातील सर्वच मुलं सुदृढ आहेत. सध्या सोशल मीडियावर ही महिला आणि तिच्या संपू्र्ण कुटुंबाची वेगळीच चर्चा रंगली आहे. (latest Marathi News)

समोर आलेल्या माहितीनुसार, महिलेने एकाच वेळी एवढ्या मुलांना जन्म दिला आणि यातील एकही मुल न दगावल्याने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये महिलेचे नाव नोंदवण्यात आले आहे. सध्या ही सर्व मुलं १९ महिन्यांची आहेत. ९ मुलांमध्ये ४ मुलं (Boy) आणि ९ मुली (Girl) आहेत.

हलीमा किसे असे या महिलेचे नाव असून अब्देलकादर अरबे असे त्यांच्या पतीचे नाव आहे. त्या माली येथील रहिवासी आहेत. जेव्हा त्यांनी मुलांना जन्म दिला तेव्हा प्रत्येक मुलाचे वजन ५०० ग्रॅम ते १ किलो इतके होते. साल २०२१ मध्ये या मुलांचा जन्म झाला. प्रसूती वेळी हलीमा मोरोक्कोला आल्या होत्या. आपल्या मुलांच्या तब्येतीला कसलाही धोका नाही हे स्पष्ट झाल्यानंतर आता त्या पुन्हा आपल्या घरी गेल्या आहेत.

कदिदिया, फतौमा, हवा, एडमा, ओमू अशी चार मुलींची नावे आहेत. तर मोहम्मद, ओमर, एल्हादजी आणि बाह अशी मुलांची नावे आहेत. सध्या ९ मुलांची ही आई सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: नांदेड भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

PF Withdraw : पीएफ खात्यातून पैसे काढणे आणखी सोपे; फक्त 'या' ५ स्टेप्स करा फॉलो

Assembly Election 2024 : वडिलांच्या पराभवाचा बदला घेण्याची तयारी, भाजपच्या मंदा म्हात्रेंविरोधात संदीप नाईक मैदानात?

Delhi Metro Job: दिल्ली मेट्रोत नोकरीची संधी; महिना ७२,००० पगार; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

Maharashtra Assembly Election : पुण्यात कारमध्ये 5 खोके कॅश पडकली, शिंदेंच्या बड्या नेत्यावर आरोप, संजय राऊतांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT