Bengaluru News Saam Tv
देश विदेश

Bengaluru News: अ‍ॅपलच्या लॅपटॉप सांडली कॉफी, महिलेची थेट कोर्टात धाव, पण...

Bengaluru : बंगळुरुमध्ये लॅपटॉप खराब झाला म्हणून एका तरुणीने चक्क कोर्टात धाव घेतली आहे. मात्र तरुणीची हुशारी कोर्टासमोर फार टिकली नाही. तरुणीकडून चुकून लॅपटॉपवर कॉफी सांडली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

A Woman Filed Case Against Apple Company:

बंगळुरुमध्ये लॅपटॉप खराब झाला म्हणून एका तरुणीने चक्क कोर्टात धाव घेतली आहे. मात्र तरुणीची हुशारी कोर्टासमोर फार टिकली नाही. तरुणीकडून चुकून लॅपटॉपवर कॉफी सांडली होती. त्यामुळे लॅपटॉप खराब झाला होता. याबाबत तरुणीने कंपनीविरोधात कोर्टात धाव घेतली होती. परंतु कोर्टात निकाल कंपनीच्या बाजूने लागला. (Latest News)

बंगळुरूमध्ये एका ३१ वर्षीय तरुणीने गेल्या वर्षी ५ जानेवारीला अॅपल मॅकबुक प्रो १३ इंचाचा लॅपटॉप खरेदी केला होता. तिने हा लॅपटॉप १ लाख ७४ हजार रुपयांना खरेदी केला होता. त्याचसोबत २२ हजार रुपयांना तिने AppleCare+ कव्हरेजदेखील खरेदी केला होते. यात तिला लॅपटॉपचे नुकसान झाल्यास तो दुरुस्त केला जाईल, असे आश्वासन दिले होते.

काही दिवस तरुणीने लॅपटॉप व्यवस्थित वापरला. एके दिवशी तिच्याकडून लॅपटॉच्या किबोर्डवर चुकून कॉफी सांडली. त्यामुळे लॅपटॉप बंद पडला. लॅपटॉपच्या इंटरनल पार्ट्समध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे तिने अॅपल स्टोअरमध्ये लॅपटॉप बिघडल्याची तक्रार केली होती. मात्र द्रव पदार्थ पडल्याने लॅपटॉपचे नुकसान झाल्यास AppleCare+ अंतर्गत लॅपटॉपची दुरुस्ती होत नसल्याचे तिला सांगण्यात आलं आणि लॅपटॉप परत केला.

मात्र महिला आपला लॅपटॉप दुरुस्त करुन द्यावा, या मागणीवर ठाम होती. यासाठी तिने अखेर २३ जानेवारी रोजी ग्राहक विवाद निवारण आयोगकडे कंपनीविरोधात तक्रार केली. मात्र या तक्रारीचाही तिला फार फायदा झाला नाही. आयोगाने निकाल कंपनीच्या बाजूने दिला. महिलेने तक्रार करताना अर्धवट माहिती दिली होती. त्यामुळे तिने केलेले दावे सिद्ध करण्यात ती अपयशी ठरली, असं आयोगाने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पारा घसरला, मुंबई-पुण्यासह राज्यात थंडीची लाट

Pune Crime: मित्र ठरले वैरी! व्यावसायिकाच्या डोक्यात झाडली गोळी; गोळीबाराच्या घटनेनं पिंपरी चिंचवड हादरलं

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या eKYC साठी मुदतवाढ मिळणार का? महत्वाची माहिती समोर

MCA Election: मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणूक; अजिंक्य नाईक गटाला 12 जागा, आशिष शेलारांना धक्का, उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड

MP Shrikant Shinde : मुंब्र्यात दहशतवादी पथकाकडून सर्च ऑपरेशन करण्याची गरज; खासदार श्रीकांत शिंदे असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT